महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गाबा कसोटीत पावसाचाच खेळ

11:24 AM Dec 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खराब हवामानामुळे गाबा कसोटी अनिर्णीत : मालिका 1-1 बरोबरीत : चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

Advertisement

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली आहे. पाचव्या दिवशी पावसामुळे जास्त खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या होत्या. यानंतर ब्रिस्बेनमध्ये जोरदार पाऊस झाला आणि खराब हवामानामुळे सामना अनिर्णित राहिला. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता पुढील सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे, जो बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 445 धावा केल्या होत्या. यादरम्यान, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शतके झळकावली. हेडने 152 धावांची शानदार खेळी केली होती. तर स्मिथने 101 धावा केल्या होत्या. अॅलेक्स केरीने 70 धावांची खेळी खेळली. या काळात जसप्रीत बुमराहने भारताकडून 6 विकेट घेतल्या. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 260 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने 139 चेंडूंचा सामना करत 89 धावा केल्या. रवींद्र जडेजाने संयमी अर्धशतक झळकावले. त्याने 123 चेंडूंचा सामना करत 77 धावा केल्या. याशिवाय, आकाशदीप व बुमराह या जोडीने 10 व्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत टीम इंडियाला फॉलोऑन मिळवून दिला. आकाशदीपने अखेरीस 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर बुमराह 10 धावांवर नाबाद राहिला. पाचव्या दिवशी आकाशदीप बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 260 धावांत संपला.

भारतीय गोलंदाजांचा धुमाकूळ

टीम इंडियाला ऑलआऊट केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 185 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. या आघाडीसह कांगारुंनी दुसऱ्या डावाला सुरुवात केली. गाबाच्या खेळपट्टीवर पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा धक्का दिला. उस्मान ख्वाजा 8 तर मार्नस लाबुशेन केवळ 1 धावा करुन बाद झाला. बुमराहनंतर आकाशदीपनेही नॅथन मॅकस्विनी (4) आणि मिचेल मार्शला (2) तंबूत पाठवले. काही वेळाने मोहम्मद सिराजनेही वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेतले, त्याने प्रथम स्टीव्ह स्मिथ (4) आणि नंतर ट्रॅव्हिस हेडला 17 धावांवर बाद केले. अॅलेक्स् केरीने नाबाद 20 तर पॅट कमिन्सने 22 धावा फटकावल्या. स्टार्क 2 धावांवर नाबाद राहिला. यावेळी ऑस्ट्रेलिया 7 बाद 89 अशी स्थिती होती. यादरम्यान कांगारुंनी आपला दुसरा डाव घोषित केला व टीम इंडियाला विजयासाठी 275 धावांचे टार्गेट दिले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारताने बिनबाद 8 धावा केल्या होत्या, पण यावेळी पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्याचा आला. काही वेळ प्रतिक्षा केल्यानंतर दोन्ही संघाच्या संमतीने सामना अनिर्णीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 445 व दुसरा डाव 18 षटकांत 7 बाद 89 घोषित (केरी नाबाद 20, कमिन्स 22, ट्रेव्हिस हेड 17, बुमराह 3 तर सिराज व आकाशदीप प्रत्येकी दोन बळी).

भारत पहिला डाव 260 व दुसरा डाव बिनबाद 8.

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणारा बुमराह पहिलाच

भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 3 बळी घेण्याची किमया केली. बुमराह आता ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता. ज्यांनी ऑस्ट्रेलियन भूमीवर गोलंदाजी करताना 51 विकेट घेतले होते. बुमराहच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात 53 विकेट्स आहेत.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

जसप्रीत बुमराह - 53 विकेट्स

कपिल देव - 51 विकेट्स

अनिल कुंबळे - 49 विकेट्स

आर. अश्विन - 40 विकेट्स

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेत आफ्रिकेला फायदा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. भारताने यावेळी पराभव टाळला खरा, पण त्यानंतरही त्यांना फटका बसला आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचा फायदा आता दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेत आफ्रिकन संघाने 63.33 टक्केवारीसह आपले अव्वलस्थान आणखी मजबूत केले आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना विजयाच्या टक्केवारीमध्ये फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी ही 58.89 अशी घ्तर भारताची टक्केवारी ही 55.88 एवढी घसरली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजून दोन सामने आहेत. या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला तरच त्यांना फायनलसाठी आपली दावेदारी सिद्ध करता येऊ शकते.

प्रतिक्रिया

हा निकाल आम्ही स्वीकारतोय. पावसामुळे सामन्यात अडथळा येणे हे चांगले नव्हतं, पण 1-1 अशी बरोबरी झाल्याने आता आम्हाला आत्मविश्वासाने मैदानात उतरता येईल. चौथ्या दिवशी सामन्यात आमची परिस्थिती बिकट होती. अशावेळी कोणीतरी तिथं उभे राहणं गरजेचं होतं. हवामानामुळं हा संपूर्ण सामना होणार नाही याची कल्पना आम्हाला आली होती. मात्र, तो निर्णय होईपर्यंत खिंड लढवणे गरजेचे होते. जडेजा आणि राहुलला हे श्रेय जातं. आकाश दीप आणि बुमराहला लढताना पाहून खूप छान वाटले. आता चौथ्या कसोटीत नव्या उमेदीने विजयासाठी उतरणार आहे.

 रोहित शर्मा, भारतीय कर्णधार

 

Advertisement
Tags :
#bcci#border gavaskar trophy#ind vs aus#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMediacricket news
Next Article