For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडिया पराभवाच्या छायेत

06:58 AM Dec 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडिया पराभवाच्या छायेत
Advertisement

दिवसअखेरीस 5 बाद 128 धावा : ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/ अॅडलेड

अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसरा दिवसही यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावे राहिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. टीम इंडिया अजूनही 29 धावांनी मागे असून ऋषभ पंत (28) आणि नितीश कुमार रे•ाr (15) खेळत आहेत. भारताच्या 180 धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर 337 धावा केल्या व महत्वपूर्ण अशी 157 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात खेळताना भारताचे पाच फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. आज, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला पराभव टाळण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज आहे.

Advertisement

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. शनिवारी दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली कारण नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. स्मिथला केवळ दोनच धावा करता आल्या तर मॅकस्विनीने 39 धावा केल्या. यानंतर, लाबुशेन व ट्रेव्हिस हेड यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले. लाबुशेनने 64 धावांचे योगदान दिले, त्याला नितीश रेड्डीने तंबूचा रस्ता दाखवला. मात्र ट्रेव्हिस हेड भारतासाठी पुन्हा डोकेदुखी ठरला. 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना हेडने 141 चेंडूत 17 चौकार व 4 षटकारासह 140 धावा केल्या. जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक होते. हेडच्या या धडाकेबाज खेळीमुळे ऑसी संघाला त्रिशतकी मजल मारता आली. एका अप्रतिम यॉर्करवर सिराजने हेडची खेळी संपुष्टात आणली. हेड बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाजही झटपट बाद झाले. कांगारुंचा पहिला डाव 87.3 षटकांत 337 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. नितीश कुमार रे•ाr व अश्विनला एक विकेट मिळाली.

टॉप ऑर्डरमधील हिरोंचा फ्लॉप शो!

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही टीम इंडियातील आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड व स्टार्कच्या भेदक माऱ्याने दुसऱ्या दिवसअखेरीस टीम इंडियाचा अर्धा संघ माघारी परतला आहे. यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, विराट कोहली, शुभमन गिल व रोहित शर्मा या दिग्गजांनी ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 337 धावांत आटोपल्यानंतर जैस्वाल व केएल राहुल यांनी भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. ही जोडी धमाकेदार सुरुवात करुन देईल असे वाटत होते, पण 7 धावांवर राहुल कमिन्सच्या जाळ्यात फसला. यानंतर बोलँडने जैस्वालला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. जैस्वालने 4 चौकारासह 24 धावा केल्या. सलामीची जोडी माघारी फिरल्यावर विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तोही बोलँडचा बळी ठरला. 11 धावा काढून विराट बाद झाला. मिचेल स्टार्कने एका उत्तम चेंडूवर गिलचा खेळ संपवला तर कर्णधार रोहितला कमिन्सने 6 धावांवर बोल्ड केले. यानंतर ऋषभ पंत व नितीश रे•ाr यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. पंत 28 तर रे•ाr 15 धावांवर खेळत होते. आज तिसऱ्या दिवशी भारताची संपूर्ण मदार पंत व रे•ाr यांच्यावर असणार आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 180 व दुसरा डाव 24 षटकांत 5 बाद 128 (जैस्वाल 24, केएल राहुल 7, शुभमन गिल 28, विराट कोहली 11, पंत खेळत आहे 28, रोहित शर्मा 6, नितीश रे•ाr खेळत आहे 15, कमिन्स व बोलँड प्रत्येकी 2 बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 337 (मॅकस्विनी 39, लाबुशेन 64, ट्रेव्हिस हेड 140, अॅलेक्स केरी 15, स्टार्क 18, बुमराह व सिराज प्रत्येकी चार बळी).

हेड पुन्हा नडला अन् भारतीय गोलंदाजांना पुरुन उरला!

पिंक बॉल कसोटीत वेगवान शतकाचा मानकरी

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ट्रेव्हिस हेड जेव्हा भारताविरुद्ध मैदानात उतरतो तेव्हा तो वेगळ्याच अंदाजात दिसतो. त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी कठीण काम आहे. शनिवारी उभय संघातील दुसऱ्या कसोटीत असेच दृश्य पहायला मिळाले. अॅडलेड कसोटीत त्याने 111 चेंडूत शतक झळकावत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या शतकी खेळीसह हेडने दिवस-रात्र कसोटीत सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. हा अनोखा कारनामा करताना त्याने स्वत:चाच विश्वविक्रम मोडला आहे. 2022 मध्ये हेडने इंग्लंडविरुद्ध 112 चेंडूत शतक झळकावले होते. दरम्यान, दिवस-रात्र कसोटीतील त्याचे हे तिसरे शतक आहे, त्याच पुढे आता लाबुशेन (चार शतके) फक्त आहे.

दिवस-रात्र कसोटीतील वेगवान शतके

  1. 111 चेंडू - ट्रेव्हिस हेड वि भारत, अॅडलेड 2024
  2. 112 चेंडू - ट्रेव्हिस हेड वि इंग्लंड होबार्ट 2022
  3. 125 चेंडू - ट्रेव्हिस हेड वि वेस्ट इंडिज अॅडलेड 2022
  4. 130 चेंडू - जो रूट वि वेस्ट इंडिज एजबस्टन 2017.

हेड-सिराजमध्ये मैदानातच राडा

टीम इंडियाविरुद्ध नेहमीच आक्रमकतेने खेळणाऱ्या हेडने दुसऱ्या कसोटीतही जबरदस्त शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. हेडच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कमबॅक केले आहे. हेडने 141 चेंडूत 140 धावांची खेळी खेळली. त्याची विकेट मोहम्मद सिराजने घेतली. मात्र, सिराजने त्याला बाद केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि वातावरण चांगलेच तापले. सिराजने हेडला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला. सिराजने हेडला क्लीन बोल्ड केले. हेडला सिराजचा यॉर्कर समजू शकला नाही आणि तो आऊट झाला. विकेट घेतल्यानंतर सिराज हेडला चल निघ बोला... यावर हेड पण बोलून तेथून निघून गेला.

दरम्यान, सामन्यानंतर हेड बोलताना म्हणाला, मी त्याला चांगला बॉल टाकला असे म्हणालो पण त्याने चुकीचा अर्थ घेतला. माझ्या बोलण्याचा अनर्थ घेत त्याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली ते पाहून मी थोडा निराश झालो, असे हेड म्हणाला.

Advertisement
Tags :

.