राज्यातील शाळांमध्ये 'माझी शाळा सुंदर शाळा''अभियान होणार सुरु
दीपक केसरकर ; सावंतवाडीत शिक्षकांचा गौरव समारंभ
सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक 75,000 शाळांमध्ये ''माझी शाळा सुंदर शाळा'' अभियान येत्या ५ डिसेंबरला सुरू केले जाणार आहे . या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आता शाळांमध्ये शेती विषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. श्री केसरकर सावंतवाडीत आले होते . यावेळी त्यांनी राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये भेट दिली असता तेथे माजी मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिपाई, कर्मचारी यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री केसरकर यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग ,राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे सचिव माजी मुख्याध्यापक व्ही. बी . नाईक, शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदीश धोंड ,माजी मुख्याध्यापक शंकर लवटे ,गुणवंतराव भीरमोळे, सेवानिवृत्त शिक्षिका रेखा राणे ,अरविंद नाईक, बाळू नाईक, चंद्रकांत परब ,आदी उपस्थित होते. यावेळी श्री केसरकर यांच्या हस्ते उपस्थित माजी मुख्याध्यापक तसेच शिक्षक आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले.