महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिक्षक विद्यार्थ्यांमधून साहित्यिक घडवू शकतात : रमेश वसकर

12:31 PM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : शिक्षकानी विद्यार्थ्यांना नवनविन साहित्य निर्माण करण्याकरता ज्येष्ठ श्रेष्ठ लेखक कवींची माहिती द्यावी. आजचे विद्यार्थी राष्ट्राच्या यशो मंदिराचे भावी आधारस्तंभ असून त्यांना घडवून समाज सुसंस्कृत करणे हे शिक्षकांचे महत्वपूर्ण कार्य आहे, शब्दात साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रमेश वंसकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिरोडा येथील निवृत्त माध्यमिक शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. शिरोडा येथील श्रीमती कमलाबाई हेदे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या साहित्या संमेलनात त्यांच्या बरोबर मुख्याध्यापक विकास पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री पद्धनाभ प्रभु देसाई,सचिव प्रकाश नाईक व शशिकांत फडके उपस्थित होते.शिक्षक मयुर गावणेकर,ऋशिकेश नाईक आर्या कामत,व वीणा मराठे यांनी कथा कथन केले. तर कवी संमेलनात संगीता चोपडेकर स्वप्ना भोसले वीणा मराठे,निकीता मडंगावकर आनंद वेळीप प्राची सांमत त्रिवेणी गावणेकर यांनी भाग घेवून कविता वाचन केले हे साहित्य संमेलन सौ.काजल बाबुराव प्रभुदेसाई,आणि श्रीमती गीता सोमण याने पुरस्कृत केले.प्रभु देसाई याने स्वागत केले.प्रकाश नाईक याने मान्यवराचा परिचय केला.तर संतोष नाईक याने आभार मानले.संघटनेचे पदाधिकारी महेश परांजपे शांबा च्यारी प्रल्हाद जोशी नरसू पाटील तसेच गावचे नागरीक उपस्थित होते. समारोप कार्यक्रमात कवी साहित्यकि महेश पारकर याने आपल्या कविता सादर करून शिक्षकांना मार्गदर्शन केले.मान्यवराच्या हस्ते शिक्षकांना प्रमाण पत्र देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article