For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

३ वर्षांच्या लेकीला चिठ्ठी लिहून शिक्षक बापाने केली बॅंकेच्या दारात आत्महत्या

05:34 PM Mar 15, 2025 IST | Pooja Marathe
३ वर्षांच्या लेकीला चिठ्ठी लिहून शिक्षक बापाने केली बॅंकेच्या दारात आत्महत्या
Advertisement

फेसबुक पोस्टमध्ये सहा जणांची लिहीली नावेः  शाळेमध्ये १८ वर्षे बिनपगारी काम केल, पगार कधी मिळणार विचारताच संस्थाचालक म्हणाले, तू फाशी घे.... : शिक्षकाने आत्महत्येआधी सोशल मिडीयावर पोस्टी केलेली व्हायरल
घटनेनंतर परिसरातून व्यक्त होतीये हळहळ

Advertisement

बीड
"श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागयच्या पण लायकीचा नाही", अशी पोस्ट सोशल मिडीयावर करत एक शिक्षकाने बॅंकेसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. बीड जिल्ह्यातल्या केज येथील स्वराज्य नगर भागात कृष्णा अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅंकेच्या शाखेसमोर या शिक्षकांने आत्महत्या केल्याचं शनिवारी सकाळी उघडकीस आली. शिक्षकाने आत्महत्येआधी फेसबुकवर पोस्टही केली आहे. ही घटना समोर येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहीत अशी की, आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव धनंजय अभिमान नागरगोजे अस आहे. केळगाव इथं कायम विनाअनुदानित आश्रम शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१९ मध्ये २० टक्के अनुदान राज्य सरकारने घोषित केले. पण त्याची अंमलबजावणी झालीच नव्हती.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या शिक्षकाला अनेक अडचणी होत्या. शेवटी बीडमध्ये बॅंकेच्या दारातच गळफास घेत या शिक्षकाने आपले जीवन संपविले. आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. या शिक्षकाच्या नावे कर्ज नाही. तसेच कुणालाही फसवले नसल्याचे ही फेसबुक पोस्टमध्ये नमुद आहे.

मुलीला उद्देशून पोस्टमध्ये लिहीले आहे की,....
"श्रावणी बाळा, शक्य झालं तर एकदा माफ कर तुझ्या बापूला. कारण मी तुला एकट्याला सोडून जातोय. तुला अजून काही कळत नाही. तीन वर्ष वय आहे तुझं. तुला काय कळणार, ज्यांना कळायला पाहीजे त्यांना कधी बापू कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कोणाचे नुकसान केले नाही. सर्वांशी चांगला वागला. पण नालायक राक्षस लोकांनी अंधारातून खूप छळ लावलाय. मला हे लोक हालहाल करू मारणार आहेत. या पोस्टमध्ये विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे" अशी सहा नावे शिक्षकांची लिहीलेली आहेत.

"या शिक्षकाने पोस्टमध्ये पुढे लिहीले, मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळेवर गेली १८ वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं ? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा, हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थाबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही", असेही या पोस्टमध्ये शिक्षकाने लिहीले आहे.

Advertisement
Tags :

.