आटपाडी तालुक्यात अवकाळीने घेतला शिक्षकाचा बळी! पत्र्याच्या शेड वर झाड पडून शिक्षकाचा मृत्यू
आटपाडी / प्रतिनिधी
गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या वादळी वाऱ्याने आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी येथे एकाचा बळी घेतला.प्रचंड वादळी वाऱ्याने विभुत वाडी येथील दत्तू रामा मोटे यांच्या घरावर बाबळीचे झाड पडल्याने त्यांचे जावई हरिदास अर्जुन लाडे (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला तर दत्तू रामा मोटे, प्रमिला हरिदास लाडे या जखमी झाल्या तर. यामध्ये गोकुळाबाई मोटे व त्यांची नात यांना दैव बलवत्तर म्हणून कोणतीही इजा झाली नाही.
गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आटपाडी तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारे सुटल्याने विभूतवाडी जवळील अनुसेवस्ती च्या पाठीमागे असणाऱ्या दत्तू मोटे यांच्या पत्र्याच्या शेडवर बाभळीचे झाड पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.यावेळी बाभळीचे झाड पडल्याचे कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने झाडाखाली अडकलेल्या दत्तू मोटे ,प्रमिला लाडे,हरिदास लाडे यांना काढण्यात आले.यामध्ये दुर्दैवाने हरिदास लाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हरिदास अर्जुन लाडे हे सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील लाडेवाडी येथील मूळ रहिवासी असून ते आटपाडी एज्युकेशन च्या बालभवन निवासी संकुल मध्ये सह म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक 4 वर्षे वयाची मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे.ही दुर्दैवी घटना झालेली समजताच, लाडेवाडी, विभुत्वाडी परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.