महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चहाच्या किमती वाढण्याची शक्यता

06:01 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मागणीत आलेल्या मंदीचा विचार करता येणाऱ्या काळामध्ये चहा पावडरच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाटा कंझ्युमरचे व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसूजा यांनी अशी शक्यता व्यक्त केली आहे. देशातील सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची कंपनी म्हणून टाटाचा उल्लेख केला जातो. महागाई व चहाची मागणी घटलेल्या स्थितीत मध्यंतरी चहाच्या किमती वाढवल्या होत्या. पण आता पुन्हा किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

विक्रीत 17 टक्के वाढ

तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या चहा विक्रीत जवळपास 17 टक्के इतकी वाढ झाली असून 444 कोटी रुपयांची चहा विक्री कंपनीने केली आहे. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने सहा टक्के घसरणीसह 282 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे.

किती वाढणार किमती?

महागाई आणि इतर गोष्टींचा सामना करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये चहाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दरम्यान चहाच्या किमती 25 ते 30 टक्के वाढवल्या जातील असे संकेत देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article