कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारखानदारांना बजावल्या कराच्या नोटीसा

05:44 PM Dec 14, 2024 IST | Pooja Marathe
Tax notices issued to manufacturers
Advertisement

पुलाची शिरोली व टोप ग्रामपंचायतीची कारवाई
उद्योजकांमधून नाराजीचा उमटतोय सूर
कोल्हापूर

Advertisement

शिरोली औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना पुलाची शिरोली ग्रामपंचायतीने सुमारे सव्वा कोटी रुपयांची तर टोप ग्रामपंचायतीकडून सुमारे ८० लाख रुपयांची थकीत कर वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे उद्योजकांच्यात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

शिरोली औद्योगिक वसाहतीत पुलाची शिरोली,टोप व शिये ग्रामपंचायतीचा समावेश होतो.या ग्रामपंचायती आप आपल्या हद्दीतील कारखान्याची कर वसुली करत असतात. पण अनेक कारखानदारांनी कित्येक वर्षे संपूर्ण कर भरलेला नाही. त्यामुळे ही थकबाकी कोटींच्या घरात गेली आहे. हि थकबाकी वसुलीसाठी व आकारणी मध्ये तडजोड करण्यासाठी लोकप्रतिनिधी व उद्योजक प्रतिनिधी यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या पण त्यामधून कोणताही तडजोडीचा मार्ग निघू शकला नाही.

अखेर संबंधित ग्रामपंचायतींनी थकबाकी वसुलीसाठी लोकन्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतीकडून थकबाकीदार कारखानदारांना युद्धपातळीवर शुक्रवार सकाळपासून नोटीसा लागू करण्याची मोहीम राबविण्यात आली. या नोटिसा मिळताच उद्योजकांच्यातून हालचाली सुरू झाल्या. याबाबत सायंकाळी चार वाजता स्मॅक भवन येथे बैठक पार पडली.पण चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

ज्या कारखानदारांकडे कराची थकीत रक्कम आहे. त्यांना वसुलीच्या नोटीसा शुक्रवारी शिरोली औद्योगिक वसाहतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लागू केल्या. शनिवारी सकाळी ११ वाजता पेठवडगांव येथील लोकन्यायालयाच्या विधी व न्याय विभागात संबंधितांनी हजर राहुन खुलासा करण्याची सूचना दिली आहे. यामुळे उद्योजकांमधून मात्र नाराजीचा सूर उमटत असून न्यायलयीन लढाई लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

थकबाकीदारांकडून सहकार्याची अपेक्षा
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कर वसुली ही गेली अनेक वर्षे थकित राहिलेली आहे. कारखानदारांनी आपली कागदोपत्री अडचण दूर करण्यासाठी तात्पुरता कर भरुन ती पूर्ण करून घेतली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे कारखानदार तसेच ग्रामस्थांकडील थकीत कर वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यास सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
पद्माजा करपे, सरपंच ग्रामपंचायत, पुलाची शिरोली

 

उद्योजकांच्या न्यायासाठी योग्य मार्गाने लढू
शिरोली ग्रामपंचायतीने नोटिसा लागू करण्यापूर्वी उद्योजकांच्या बरोबर चर्चा करणे अपेक्षित होते. कारण ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची औद्योगिक वसाहतीत सेवा सुविधा देत नाही. तरीही कर भरण्यास आतपर्यंत कोणीही विरोध केलेला नाही. पण उद्योजकांच्या न्यायासाठी योग्य मार्गाने लढा देणार!
राजू पाटील अध्यक्ष शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक) कोल्हापूर

 

शासन निर्णयाप्रमाणे नोटीसा लागू
ग्रामपंचायतीने कर भरण्यासंदर्भात वारंवार वसुली नोटीस लागू करण्यात आल्या होत्या.पण अनेक कारखाना मालकांनी कर (फाळा)न भरता थकबाकी राखली आहे.अशा थकबाकीदार व्यक्तींना शासन नियमाप्रमाणे नोटिसा लागू केल्या आहेत.वसुली बाबत आपण समन्वयाची भूमिका घेतली होती पण उद्योजक प्रतिनिधींनी तडजोडीचा भुमिका घेतली नाही.
ए.वाय.कदम ग्रामपंचायत अधिकारी.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article