कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपाकडून ६४ कोटी ७७ लाखांचा कर वसूल

11:48 AM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मालमत्ता-व्यावसायिक आस्थापनांच्या कर वसुलीसाठी विशेष पथके : उर्वरित उद्दिष्ट गाठण्यासाठी धडपड

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

मालमत्ता व व्यावसायिक आस्थापनांच्या कर वसुलीसाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक उपाययोजनांमुळे करवसुलीचे प्रमाण वाढले आहे. चालू आर्थिक वर्षात 64 कोटी 77 लाख ऊपयांचा कर वसूल झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक स्रोत वाढत आहेत.

स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या बेळगाव शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेकजण रोजगारासह इतर कारणास्तव येऊन स्थायिक होत असून त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका दरवषी मालमत्ता कर वसूल करत आहे. मनपाच्या अंतर्गत 58 प्रभाग असून अंदाजे 6 ते 7 लाख लोकसंख्या आहे. 1,58,341 मालमत्ता असून मालमत्तांचा आकार व प्रदेशावर कर आकारणी अवलंबून आहे. दरवषी अपेक्षित कर वसुलीचे उद्दिष्ट गाठले जात नसल्याचा आरोप होत असतानाच चालू वर्षात एप्रिल 2024 च्या सुऊवातीपासूनच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धडक मोहीम राबवली. त्यामुळे आतापर्यंत 64 कोटी 77 लाख ऊपयांचा कर वसूल झाला आहे. 80 टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 2024-25 या वर्षात 80 कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

महानगरपालिकेच्या व्याप्तीत 12,394 व्यावसायिक दुकाने आहेत. दरवषी कर वसुलीसाठी धडपडणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी यंदा नोव्हेंबर 2024 पासूनच विशेष मोहीम राबवली आणि कर वसूल केला. गेल्यावषी 1 कोटी 55 लाख ऊपयांचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, केवळ 89.01 लाख ऊपये वसूल झाले. नूतन व्यापार परवाना व नुतनीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याने 1 कोटी 71 लाख ऊपयांच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत 1 कोटी 35 लाख ऊपयांचा महसूल जमा झाला आहे. केवळ तीन महिन्यांत 66 लाख ऊपयांचा महसूल जमा झाला हे विशेष.

शहरातील दक्षिण आणि उत्तर विभागात आरोग्य विभागाच्यावतीने विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी धडपड चालविली आहे.

पाच टक्के सवलत

आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात कर भरल्यास पाच टक्के सवलत दिली जाते. यासाठी विविध प्रभागांमध्ये प्रचार करण्यात आला आहे. तसेच प्रमुख रस्त्यांवर जाहिराती लावून माहिती देण्यासह कर भरण्याबाबत जनजागृती करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

...अन्यथा टाळे

थकबाकी असलेल्या व्यावसायिक दुकानांना व मालमत्ताधारकांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात येत आहे. ज्या व्यावसायिक आस्थापनांकडून अनेक वर्षांपासून कर थकला आहे, तशा आस्थापनांवर नोटीस चिकटविली जात आहे. तरीदेखील प्रतिसाद न दिल्यास त्या आस्थापनांना टाळे ठोकले जात आहेत.

कर संकलनावर विशेष भर

चालू वर्षात कर संकलनावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट 79.99 टक्के साध्य झाले आहे. व्यावसायिक दुकान कर वसुलीलाही अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

- शुभा. बी., मनपा आयुक्त

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article