डोक्यावर तयार होणार टॅटू
वैज्ञानिकांच्या नव्या तंत्रज्ञानामुळे मेंदूचे स्कॅनिंग झाले सोपे
मेंदूच्या अॅक्टिव्हिटी टॅटू सांगू शकेल अशाप्रकारचे तंत्रज्ञान वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. हा टॅटू डोक्याच्या स्कॅल्प म्हणजेच त्वचेवर तयार केला जाणार आहे, हा इलेक्ट्रॉनिक टॅटू असून तो तात्पुरत्या स्वरुपाचा असेल. हा टॅटू ईईजी म्हणजेच इलेक्ट्रोइन्स्पॅफ्लोग्रामप्रमाणे काम करणार आहे.
यामुळे मेंदूला स्कॅन करणे सोपे ठरणार आहे. याच्या मदतीने न्यूरोलॉजिकल कंडिशन म्हणजेच सीजर्स, एपिलेप्सी, ब्रेन ट्यूमर्सची तपासणी करता येणार आहे. सर्वसाधारणपणे ईईजी चाचणीदरम्यान स्केल आणि पेन्सिलद्वारे माणसांच्या डोक्यावर मार्किंग केले जाते, त्यानंतर त्यावर इलेक्ट्रोड्स चिकटवितात, मग इलेक्ट्रोड्सना तारांशी जोडले जाते.
या तारा थेट ईईजी मशीनशी जोडलेल्या असतात, यानंतर मशीन मेंदूच्या अॅक्टिव्हिटींना रिकॉर्ड करते. किंवा मग इलेक्ट्रोड्सची एक टोपी माणसांना परिधान करण्यास दिली जाते, ही एक वेळ घेणारी आणि अत्यंत असहज प्रक्रिया असते, याचमुळे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे इंजिनियरिंग प्राध्यापक नांशू लू यांनी हे विकसित केले आहे.
असे असणार कार्यस्वरुप
या तंत्रज्ञानाद्वारे डोक्यावर एक रोबोट टॅटू काढले, हा टॅटू एका कंडक्टिव्ह मटेरियलने तयार केला जाईल. म्हणजेच मेंदूच्या इलेक्ट्रॉनिनक तरंगांना पकडणारे मटेरियल असेल. यानंतर त्यांना तारांशी जोडले जाईल. ज्याद्वारे ईईजी मानवी मेंदूचे अध्ययन करेल. या कामासाठी केवळ 20 मिनिटे लागणार आहेत हा टॅटू काही वेळातच सुकणार आहे. हा टॅटू सुमारे 300 मिलिमीटर जाड असेल. हा सामान्य इलेक्ट्रोडसप्रमाणेच काम करेल.
शॅम्पूने धुवून होणार साफ
या तंत्रज्ञानाविषयी नवा अहवाल सेल बायोमटेरियल्स नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. ज्यात कमी केस असलेल्या पाच लोकांवर हे तंत्रज्ञान अवलंबिण्यात आले आहे. हा टॅटू मेंदूच्या तरंगांना पकडण्यास सामान्य इलेक्ट्रोड्सप्रमाणेच उपयुक्त आहे. मेंदूचे स्कॅनिंग झाल्यावर त्याला धुवून हटविता येणार आहे. किंवा शॅम्पूने धुवून तो हटविता येईल. तर सामान्य इलेक्ट्रोड्समध्ये लावला जाणारा ग्लू सहजपणे निघू शकत नाही.