ओटीटीवर दिसणार टाटांची कहाणी
नसीरुद्दीन शाह यांची वेबसीरिज
भारतातील प्रसिद्ध उद्योजक राहिलेले जेआरडी टाटा यांची पूर्ण कहाणी आता एका सीरिजच्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. टाटा समुहाला भारतातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक ठरविणारे जेआरडी टाटा म्हणजेच जहांगरी रतनजी दादाभाई टाटा यांच्या जीवनावर ‘मेड इन इंडिया-ए टायटन स्टोरी’ नावाने वेबसीरिज निर्माण केली जात आहे. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह हे जेआरडी टाटा यांची व्यक्तिरेखा साकारणात आहेत.
या सीरिजमध्ये टायटन ब्रँड तयार होण्याची कहाणी आणि जेआरडी टाटा यांची कामगिरी दाखविण्यात येणार आहे. याचबरोबर जर्क्सेस देसाई यांची कहाणी दाखविली जाणार आहे, ज्यांनी टायटन घड्याळ अन् तनिष्क यासारख्या ब्रँडचा पाया रचला होता. जर्क्सिस देसाई हे पारसी होते, यामुळे सीरिजमध्ये यांची व्यक्तिरेखा एक पारसी कलाकार साकारणार आहे. याकरता जिम सर्भची निवड करण्यात आली आहे.
जर्क्सिस देसाई यांच्या पत्नी रजनी यांच्या व्यक्तिरेखेत नमिता दुबे दिसून येणार आहे. ही सीरिज विनय कामत यांचे पुस्तक ‘टायटन : इनसाइड इंडियाज मोस्ट सक्सेसफुल कंझ्युमर ब्रँड’वर आधारित आहे. 1980 चा दशक या सीरिजमध्ये दाखविण्यात येणार आहे. त्या काळात जेआरडी टाटा आणि जर्क्सेस देसाई यांनी कठोर मेहनत करत स्वत:च्या क्रांतिकारक उत्पादनांद्वारे मोठे साम्राज्य उभे केले होते.