महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टाटा सन्सची टाटा प्लेमध्ये 10 टक्के हिस्सा खरेदी

06:22 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टीमसेकसोबत 835 कोटींचा करार, डीटीएच कंपनीतील हिस्सा आता 70 टक्क्यांवर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टाटा सन्सने टाटा प्लेमधील आपली भागीदारी 70 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. समूहाने सिंगापूर गुंतवणूक फर्म टेमासेककडून कंपनीतील 10 टक्के भागभांडवल 100 दशलक्ष डॉलर (सुमारे 835.19 कोटी)मध्ये खरेदी केले आहे. टाटा प्लेमध्ये समूहाचा आधीच 60 टक्के हिस्सा होता, तर डिस्नेचा 30 टक्के हिस्सा होता, अशीही माहिती दिली जात आहे.

अहवालानुसार टाटा प्लेने शेअर होल्डिंगमधील बदलाबाबत माहिती आयटी मंत्रालयाला दिली आहे. टाटा प्ले ही टाटा समूहाची एकमेव ग्राहकाभिमुख मीडिया आणि मनोरंजन कंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी आहे. त्यांचे 2.1 कोटी इतके ग्राहक आहेत. कंपनीचे सध्याचे मूल्य 100 अब्ज डॉलर आहे. कोविडच्या अगोदर हेच बाजारमूल्य 300 अब्ज डॉलरच्या घरात होते.

टाटा डिस्नेचे स्टेकही विकत घेऊ शकते

या करारानंतर, टाटा प्ले आता टाटा सन्स आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील 70:30 चा संयुक्त उपक्रम बनेल. तथापि, आगामी काळात डिस्नेची भागीदारी देखील कमी होऊ शकते, कारण अहवालानुसार, डिस्ने डीटीएच प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडू इच्छित आहे. दोघांमध्ये स्टेक विकल्याचीही चर्चा आहे.

टाटा प्ले टेलिव्हिजन आणि ओटीटी सेवा

समूहाच्या वेबसाइटनुसार, टाटा प्ले हा टाटा समूह आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या 21 फस्ट सेन्चुरी फॉक्स आयएनसी यांचा संयुक्त उपक्रम आहे.

टेमासेकने 17 वर्षांपूर्वी घेतला 20 टक्के हिस्सा

टेमासेकने 2007 मध्ये टाटा प्लेमध्ये गुंतवणूक केली होती आणि त्याचा 20 टक्के हिस्सा विकत घेतला होता. टाटा प्ले 2001 मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि 2006 मध्ये सेवा सुरू केली. नंतर त्याचे नाव टाटा स्काय होते, जे नंतर टाटा प्लेमध्ये बदलले गेले. टेमासेककडून बायबॅकसाठी टाटा समूह बराच काळ प्रयत्न करत होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article