महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लवकरच टाटा मोटर्सचे होणार विभाजन

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्यावसायिक वाहन, पॅसेंजर व्यवसाय होणार स्वतंत्र

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

टाटा समूहातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स यांनी आपल्या व्यवसायाचे विभाजन करण्याचे निश्चित केले आहे. टाटा मोटर्सने सांगितले की आपल्या पॅसेंजर प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करता यावे यासाठी व्यवसायाचे विभाजन करणार असल्याचे म्हटले आहे. विभाजनानंतर दोन स्वतंत्र कंपन्या कार्यरत होणार असल्याची माहिती टाटा मोटर्सने दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक वाहनांचा व्यवसाय आणि प्रवासी वाहनांचा व्यवसाय स्वतंत्रपणे केला जाणार आहे. एकंदर दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे कार्यरत झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होणार आहेत.

काय म्हणाले चेअरमन

कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले, की टाटा मोटर्स गेल्या काही वर्षापासून आवश्यक त्या बदलांसाठी प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीनेच वरील व्यवसायांचे विभाजन करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. तीनही ऑटोमेटीव्ह क्षेत्रातील कंपन्या आता स्वतंत्रपणे काम करत असून त्यांचे प्रदर्शन उत्तमपणे दिसून आले आहे. विभाजनाच्या प्रक्रियेनंतर दोन्ही कंपन्यांना स्वतंत्रपणे आपल्या व्यवसायावर विकासासाठी योग्य ते लक्ष देणे शक्य होणार आहे. या विभाजनाच्या प्रक्रियेनंतर समभागधारकांना दोन्ही कंपन्यांचे समान समभाग प्राप्त होणार आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

किती लागणार कालावधी

सदरची विभाजनाची प्रक्रिया होण्यासाठी 12 ते 15 महिन्यांचा कालावधी असल्याची माहितीही चंद्रशेखरन यांनी दिली आहे. सदरचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार असून त्यामध्ये मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article