महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा मोटर्स : जुलैमध्ये 71,996 वाहनांची विक्री

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जूनच्या तुलनेत 11 टक्क्यांनी कमी

Advertisement

नवी दिल्ली : जुलैमध्ये टाटा मोटर्सची एकूण विक्री 11 टक्क्यांनी घटून 71,996 युनिट्सवर आली आहे. कंपनीने जुलै 2023 मध्ये 80,633 युनिट्सची विक्री केली होती. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात एकूण देशांतर्गत विक्री 11 टक्क्यांनी घसरून 70,161 युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 78,844 युनिट्स इतकी राहिली होती. याशिवाय, टाटा मोटर्सची देशांतर्गत बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसह (ईव्ही) प्रवासी वाहनांची विक्री सहा टक्क्यांनी घसरून 44,954 युनिट्सवर आली आहे. जुलै 2023 मध्ये ती 47,689 युनिटस् होती. व्यावसायिक वाहनांची विक्री जुलैमध्ये 18 टक्क्यांनी घसरून 27,042 युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षी 32,944 युनिट्स होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article