टाटा मोर्ट्सच्या जागतिक विक्रीत घसरण
एप्रिल ते जून तिमाहीमधील आकडेवारीतून माहिती
नवी दिल्ली :
आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत टाटा मोर्ट्सची सर्व व्यावसायिक वाहने आणि टाटा देवू रेंजच्या पहिल्या जागतिक किरकोळ विक्री 87,569 युनिट्स राहिली आहे. टाटा मोटर्सची एप्रिल ते जून तिमाहीत एकूण जागतिक विक्री 9 टक्क्यांनी घटून 2,99,664 वर राहिली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल ते जून तिमाहीत विक्री 3,29,847 युनिटची राहिली होती.
टाटा मोटर्सने आपल्या दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून तिमाहीत प्रवासी वाहनांची व्यावसायिक वाहनांची विक्री वर्षाच्या आधारे 10 टक्क्यांनी कमी होत ती 1,24,809 युनिट्स राहिली आहे. जॅग्वार लँड रोव्हरची विक्री ही जून तिमाहीत 87,286 वर राहिली. दरम्यान यावेळी टाटा मोटर्सने नवीन मिनी ट्रक ‘टाटा एस प्रो’ सादर केला आहे. ज्याची किंमत 3.99 लाख रुपये सुरुवातीला राहणार आहे. हा भारतामधील सर्वात स्वस्त मिनी ट्रक आहे. टाटा मोटर्सचे कार्यकारी अधिकारी गिरीश वाघ यांनी सांगितले की हा मिनी ट्रक सर्व सोयी सुविधांनी सज्ज असणार आहे.