For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोटर्सची कार्व्ह पुढील वर्षी बाजारात

06:42 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोटर्सची कार्व्ह पुढील वर्षी बाजारात
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

टाटा मोटर्सची सीएनजी प्रकारात कर्व्ह ही कार पुढील वर्षी लाँच केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. टाटा मोटर्स भारतीय बाजारामध्ये लोकप्रिय कार्स नित्यनियमाने उतरवत आहे. पुढील वर्षीही अनेक कार्स नव्याने बाजारात दाखल करण्याची योजना कंपनीची आहे. या अंतर्गत टाटा कर्व्ह ही सीएनजी इंधनावर आधारीत कार पुढील वर्षी सादर करणार आहे. टाटाची कर्व्ह ही गाडी सध्या पेट्रोल इंधनावर चालणारी बाजारात दिसून येते. पुढील वर्षी येणारी सीएनजी कर्व्ह ही गाडी 1.2 लीटर रेवो ट्रॉन इंजिनसह येण्याची शक्यता असून यामध्ये 5 स्पिड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय दिला जाणार आहे. या गाडीत शार्कफिन अॅन्टीना, एलईडी लाईट, एलईडी डीआरएल, फ्लश डोअर हॅन्डल, पॅनारॉमीक सनरुफ, 17 इंचांच्या अॅलॉयव्हिल्स दिली जाणार आहेत. या शिवाय 10.25 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टीम, वायरलेस अॅन्ड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले व फोन चार्जिंग सारख्या सुविधादेखील दिल्या जाणार आहेत, असे कळते. सहा एअरबॅग्सही सुरक्षिततेसाठी दिल्या जाणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.