मेडइन इंडिया 2025 रेंज रोव्हर स्पोर्ट लाँच
किंमत 1.45 कोटी : मसाज फ्रंट सीट्स आणि हेडअप डिस्प्लेसह अन्य सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सच्या मालकीच्या लक्झरी ब्रँड जॅग्वार लँड रोव्हरने भारतीय बाजारपेठेत मेडइन-इंडिया एसयूव्ही रेंज रोव्हर स्पोर्ट लाँच केली. नवीन कार समोरच्या सीटची मालिश करणे आणि हेड-अप डिस्प्ले यांसारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे.
लक्झरी एसयूव्ही दोन प्रकारांसह लॉन्च करण्यात आली आहे. यात पी400 डायनॅमिक एचएसइ आणि डी350 डायनॅमिक एचएसइ यांचा समावेश आहे आणि दोन्हीची किंमत 1.45 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. ब्रँडने डायनॅमिक एसई व्हेरियंट बंद केल्यामुळे कारची किंमत स्थानिकरित्या एकत्रित केलेल्या रेंज रोव्हर स्पोर्टपेक्षा 5 लाख रुपये जास्त आहे. त्याच वेळी, मेड इन इंडिया एसयूव्ही ही संपूर्ण बिल्ट युनिटपेक्षा 25 लाख रुपये स्वस्त आहे आणि भारतात पोर्श केयेन (रु. 1.43 कोटीपासून सुरू होणारी) आणि बीएमडब्लू एक्स 7 (1.3 कोटीपासून सुरू होणारी) सारख्या लक्झरी एसयूव्ही यांच्यासोबत स्पर्धा राहणार आहे.
टाटा बनविणार जग्वारसाठी बॅटरी
टाटा समूहाने यूकेमध्ये ग्लोबल बॅटरी सेल गिगाफॅक्टरी स्थापन करण्याची घोषणा केली. यामध्ये कंपनी जग्वार लँड रोव्हर आणि इतर कंपन्यांसाठी बॅटरी बनवणार आहे. टाटा समूहाने जागतिक बॅटरी सेल गिगाफॅक्टरी स्थापन करण्यासाठी 4 अब्ज पौंडांपेक्षा जास्त म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. 40 जीडब्लूएच गीगाफॅक्टरी हा युरोपमधील सर्वात मोठा आणि भारताबाहेरील टाटाचा पहिला कारखाना होणार आहे.