महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा समूहाचा राज्य सरकारसोबत करार

06:33 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2,300 कोटींची होणार गुंतवणूक : 1,650 जणांना मिळणार रोजगार

Advertisement

वार्ताहर/ बेंगळूर

Advertisement

टाटा समूहाचा भाग असलेल्या एअर इंडिया आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी राज्यात विविध प्रकल्पांसाठी 2,300 कोटी ऊपयांची गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत राज्य सरकारसोबत करार केला.

मोठे आणि मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योग खात्याचे मुख्य सचिव सेल्वकुमार, एअर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी निपुण अगरवाल आणि टीएएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकरण सिंग यांनी  करारांची देवाणघेवाण केली. यावेळी राज्य सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव एल. के. अतिक, उद्योग खात्याच्या आयुक्त गुंजन कृष्णा आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विधानसौध येथे झालेल्या करारांच्या देवाणघेवाणीनंतर बोलताना एम. बी. पाटील यांनी, टाटा समूहाच्या या गुंतवणुकीतून थेट 1,650 रोजगार निर्माण होणार आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी एअर इंडिया बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान देखभाल, दुऊस्ती आणि ओव्हर-हॉल (एमआरओ) युनिट उभारण्यासाठी 1,300 कोटी रु. गुंतवणूक करत आहे. त्यामुळे 1,200 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार असून 25,000 हून अधिक अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) तीन प्रकल्पांसाठी 1,030 कोटी ऊपयांची गुंतवणूक करणार आहे. यापैकी 420 कोटी ऊपये नागरी विमानांचे मालवाहतूक विमानात रुपांतर करण्यासाठी युनिट उभारण्यासाठी वापरले जाणार आहे. 310 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून गन उत्पादन युनिट, 300 कोटी रुपयांच्या खर्चातून एरोस्पेस आणि संरक्षण संशोधनासह विकास केला जाणार आहे. यामुळे 450 रोजगार निर्माण होतील, असे मंत्री एम. बी. पाटील म्हणाले.

टीएएसएल कंपनीला आवश्यक असलेल्या 13,000 सुट्या भागांपैकी 50 टक्के पुरवठा बेंगळूर विमानतळाजवळ आणि कोलार येथे उभारल्या जाणाऱ्या बंदूक उत्पादन युनिटद्वारे करण्याची योजना आखत आहे. यामुळे 300 हून अधिक लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 2-3 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. 1939 मध्ये बेंगळूरमध्ये एचएएलच्या स्थापनेपासून विमान वाहतूक क्षेत्रात कर्नाटक आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण विभागाला आवश्यक असलेली 67 टक्के विमाने आणि हेलिकॉप्टर कर्नाटकात तयार होतात. याशिवाय, देशाच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील निर्यात उलाढालीत राज्याचा वाटा 65 टक्के आहे. देशातील या क्षेत्रातील 70 टक्के कंपन्या कर्नाटकात आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article