कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा कमर्शियल व्हेईकलचा समभाग सूचीबद्ध

06:50 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

विलगीकरणानंतर टाटा समूहातील कंपन्या अलग झाल्या आहेत. 4 मार्च 2024 रोजी कंपनीने विलगीकरणाची घोषणा केली होती. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचे (टीएमसीव्हीएल)समभाग बुधवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. एनएसईवर समभाग 335 रुपयांवर सूचीबद्ध झाला. जवळपास 28 टक्के प्रीमियमसह समभाग बाजारात सूचीबद्ध झाला आहे तर बीएसईवरती हा समभाग 330 रुपयांवर 26 टक्के प्रीमियमसह खुला झाला होता.

Advertisement

टाटा मोटर्सने याच आठवड्यात शेअर बाजाराला माहिती देताना त्यांच्या कमर्शियल व्हेईकल व्यवसाय कंपनीचा समभाग या आठवड्यात सूचीबद्ध होणार असल्याचे म्हटले होते. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी आहे. छोट्या कार्गो वाहनांसह मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची निर्मिती कंपनी करते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article