कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा कॅपिटलचा आयपीओ सप्टेंबर अखेर

07:00 AM Sep 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

17,200 कोटी रुपये उभारणीचे ध्येय : कंपनीचे मूल्य 1.59 लाख कोटी राहण्याची शक्यता

Advertisement

मुंबई  : टाटा समूहाची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल आपला आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा आयपीओ सप्टेंबरच्या अखेरीस येऊ शकतो. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी सुमारे 17,200 कोटी रुपये उभारू शकते. जर तसे झाले तर हा 2025 मधील सर्वात मोठा इश्यू राहणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कंपनीने आयपीओमधून 1.59 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. कंपनीने आयपीओसाठी 4 ऑगस्ट रोजी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे ड्राफ्ट पेपर्स म्हणजेच अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केले होते. कंपनी आयपीओमध्ये एकूण 47.58 कोटी शेअर्स विकणार आहे

Advertisement

कंपनीचे गोपनीय प्री-फायलिंग

कंपनीने 5 महिन्यांपूर्वी आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओसाठी सेबीकडे हे प्री-फायलिंग गोपनीय होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article