कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

होड्यांच्या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब (अ) प्रथम

05:28 PM Aug 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली :

Advertisement

संकल्प फाउंडेशन गावभाग यांच्यावतीने रविवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या जलक्रीडा रपर्धेत एकूण १२ बोटींचा सहभाग होता. थरारक स्पर्धेत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब (अ) यांनी शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख ३१,००१ रुपये व मानाचे निशाण प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक कसबे डिग्रजच्या डिग्रज बोट क्लबने तर तृतीय क्रमांक समडोळीच्या वारणामाई बोट क्लबने मिळवला. प्रथम फीत शिवण्याचा विशेष मानाचा फेटा व रोख पारितोषिक सांगलीवाडीच्या गणेश आवटी यांना  मिळाले.

Advertisement

कृष्णाकाठावरील दोन्ही घाट प्रेक्षकांनी फुलून गेले होते. यावेळी घाट परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर नागरिकांनी चविष्ट पदार्थांचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा नेते शेखर इनामदार, माजी नगरसेवक धीरज सूर्यवंशी, विजय भिडे, भारती दिगडे, नितीन शिंदे, सुब्राव मद्रासी, संजय कुलकर्णी, शरद नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन संकल्प फाउंडेशनचे महावीर कर्वे व अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनाथ कर्वे मित्र परिवाराने केले. सूत्रसंचालन डॉ. सुहास व्हटकर यांनी केले. यशस्वी आयोजनात पदाधिकारी व सदस्यांचा सहभाग होता.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article