महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल’ प्रदर्शन स्टॉल बुकिंगला प्रारंभ

10:20 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘गृहबांधणीसाठी लागणारे साहित्य एकाच छताखाली’ प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण : 21 नोव्हेंबरपासून सीपीएड मैदानावर सुरूवात

Advertisement

बेळगाव : ‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल-2024 गृहबांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली’ या प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण व स्टॉल बुकिंग शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव व कन्सEिल्टग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बेळगाव आयोजित हे प्रदर्शन 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सीपीएड मैदानावर होणार आहे. प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण भाग्यनगर येथील लोकमान्य सोसायटीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले.

Advertisement

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई, इव्हेंट चेअरमन अरविंद खडबडी, कन्सEिल्टग सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जी. टी., इव्हेंट चेअरमन महेश अरबोळे, ‘तरुण भारत’चे चिफ मार्केटिंग ऑफिसर उदय खाडिलकर, श्रीराम इनोव्हेशनचे संचालक सचिन हंगिरगेकर, बिर्ला शक्ती सिमेंटचे सिनियर सेल्स मॅनेजर शांताप्पा हळींगळी, जेके सुपर सिमेंटचे रिजनल टेक्निकल मॅनेजर महेश वाळवेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रदर्शनाने वेगळी ओळख केली

उदय खाडिलकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून 11 व्या घरकुल प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली. 2002 पासून घरकुल प्रदर्शन आयोजित केले जात असून, सध्या या प्रदर्शनाने आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही यशस्वीरीत्या प्रदर्शन भरविले जाणार असून बिल्डिंग मटेरियल व बांधकाम व्यवसायाची संपूर्ण माहिती या प्रदर्शनात दिली जाणार आहे.

स्टॉलधारकांना उत्तम प्रतिसाद

रमेश तुबची म्हणाले, लोकांचा दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या स्टॉलधारकांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने स्टॉलधारक स्वत:हून या प्रदर्शनात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. विनयकुमार बाळीकाई म्हणाले, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून यावर्षीचे प्रदर्शन अधिक भव्य व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक वर्षी प्रदर्शन भरवावे, अशी स्टॉलधारकांची मागणी होत असून याचा विचार भविष्यात केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संदीप जोग यांनी केले. यावेळी इव्हेंट चेअरमन महेश अरबोळे, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे उमेश सरनोबत, आनंद कुलकर्णी, विनय बेहरे, अजय पाटील, वीरेश शेट्टण्णावर, निलेश पाटील, महेश हेब्बाळे, चंद्रकांत मणगुत्ती, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सदस्य सोमनाथ कुडचीकर, नरेश कुलगोड, आनंद चौगुले, कृष पॅनस, प्रभाकर कोलार, डी. बी. पाटील तसेच ‘तरुण भारत’चे सोहन पाटील, सुहास देशपांडे, रवी हेमाद्री यांच्यासह इतर उपस्थित होते.

प्रथम स्टॉल बुकिंग करणाऱ्यांचा सत्कार

घरकुल प्रदर्शनात दरवर्षी सहभागी होणाऱ्या तसेच यावर्षीही बुकिंग करणाऱ्या स्टॉलधारकांचा कार्यक्रमादरम्यान सत्कार केला. पूनम ट्रेडर्सचे अरुण पटेल, मोरबी सिरॅमिकचे भाविक जोतानिया, अर्बन रुफचे दिनेश पाटील, गणेश ट्रेडर्सचे शांताराम शिंदोळकर, विश्वास सिरॅमिकचे जय पटेल, सागर सिरॅमिकचे ऋषिकेश काकतीकर, व्ही. आर. सिरॅमिकचे विनायक पाटील, स्मार्ट एलिव्हेटर्सचे राहुल मलंक, उत्कर्ष विंडोजचे रणजित पाटील, जाजू सिरॅमिकचे ऋषभ जाजू यांचा सत्कार केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article