सावंतवाडीत घोंघावणाऱ्या अपप्रवृत्तींना जनता निवडणुकीतून जागा दाखवेल
तर निवडणुकीनंतर त्यांची जागा जेलमध्ये असणार ; पत्रकार परिषदेत दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकच नाही तर दोन अपप्रवृत्ती घोंघावत आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी या अप्रवृत्तीविरुद्ध आपला संघर्ष आहे .या संघर्षाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता साथ देणार आहे. या अपप्रवृत्तींना या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून त्यांना आपल्या मूळ गावी पाठवणार आहे असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेना शिंदे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केसरकर यांनी सध्या काहीजण जेल मध्ये असणार असते .परंतु ,आचारसंहितेत अटक झाली असती तर निवडणुकीच्या तोंडावर जाणून-बुजून अटक केली असा आरोप झाला असता. परंतु निवडणुकीनंतर यांची जागा जेलमध्ये असणार आहे. यांनी साउथ इंडिया, नोर्थ इंडिया मधील कंपन्यांकडून जमिनीसाठी कोट्यावधी रुपयांचे पैसे घेतले. परंतु शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देण्यात आले नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार करूनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. परंतु निवडणुकीनंतर यांना अटक करून शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना पुन्हा परत करण्यात येतील असे केसरकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब ,महिला जिल्हाध्यक्षा ॲड. निता सावंत कविटकर ,शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर ,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, उपस्थित होते .केसरकर यांनी आपण मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुंबईत अनेक विकास कामे केली .मुंबईचा कायापालट करताना कोट्यावधीची विकास कामे आणली. त्याचबरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीनही तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. सावंतवाडी शहरात जवळजवळ दीडशे कोटीची कामे माझ्या प्रयत्नामुळे मार्गी लागली. आंबोली चौकुळ गेळे गावचा कबुलायतदार गावकर जमिनीचाही प्रश्न सुटण्यास आपल्या प्रयत्नामुळे यश आलं. आंबोलीत दीडशे कोटीचा गोल्फ कोर्स होणार आहे तर तिलारी येथे 260 एकर जमिनीवर भव्य ॲमेझॉन पार्क प्रकल्प होणार आहे. त्याशिवाय फुकेरी , शिरशिंगे ,वेर्ले माजगाव ,येथील धरणाची कामे सुरू झाली आहेत. उडेल येथे धरण होणार आहे .त्याचा फायदा सावंतवाडी शहरालाही होईल. वेंगुर्ले तालुक्यातील अनेक विकास कामे सुरू झाली आहेत. तीनही तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. येत्या सहा महिन्यात हा विकास निधी खर्च होऊन विकास कामे मार्गी लागतील. मी मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे या भागात मला सातत्याने इथे आले नाही. परंतु, विकासाकडे दुर्लक्ष केले नाही. या पुढच्या काळात कोकणची जबाबदारी देण्याची मी मागणी करणार आहे. जेणेकरून या भागातील विकास कामे मार्गी लागतील. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे जे स्वप्न नारायण राणे यांनी पाहिले होते ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही विकास कामासाठी भरघोस निधी आणला आहे. हा निधी खर्च करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. आपण शालेय शिक्षण मंत्री म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्रातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकावे यासाठी शिक्षण क्षेत्रात आवश्यक बदल केले .त्याशिवाय मराठी भाषेला अनेक वर्षांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यासंदर्भात वारंवार मागणी केली होती ती माझ्या कारकिर्दीत पूर्ण झाली .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पाठपुरावा केला त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला .आता राज्यातील साहित्यिकांना मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मराठी भवनात ते मुंबईत गेल्यावर राहण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मराठी साहित्य संमेलनाला भरघोस निधी मिळणार आहे. आपण महायुतीचे उमेदवार आहोत माझ्या प्रचाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत त्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवस येण्याचे मान्य केले आहे. परंतु एवढी मोठी मंडळी या मतदारसंघात अडकून पडू नये यासाठी माझे प्रयत्न आहेत. नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून या मतदारसंघात प्रचार करण्यात येणार आहे .या मतदारसंघातील जनता मला चौथ्यांदा जनहिताची विकास कामे पूर्ण करण्यासाठी भरघोस मतांनी निवडून देणार आहे .असा विश्वास व्यक्त करत केसरकर यांनी या मतदारसंघात दोन अपप्रवृत्ती घोंगावत आहेत या अपप्रवृत्ती विरोधात जनतेच्या हितासाठी माझा संघर्ष सुरू आहे या अपप्रवृत्तीला सावंतवाडी मतदारसंघातील जनता थारा देणार नाही. आतापर्यंत मी अनेक वेळा संघर्ष केला त्या संघर्षाला जनतेने साथ दिली आहे .या निवडणुकीतही जनता माझ्या बाजूने उभी राहील असे केसरकर यांनी स्पष्ट केले .साउथ इंडिया, नोर्थ इंडिया येथील कंपन्यांकडून जमीन खरेदीसाठी काही जणांनी कोट्यवधी रुपये आणले. या कंपन्या आमच्याही ओळखीच्या आहेत. या कंपन्यानी थेट शेतकऱ्यांकडून जमिनी घेऊन विकासात सहभागी होणे आवश्यक आहे. परंतु, या कंपन्यांकडून काही जणांनी जमिनी खरेदीसाठी आणलेले पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. तशा तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. पोलिसांकडे या संदर्भातही तक्रारी आहेत. मात्र ,पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही. परंतु, एक महिन्यानंतर ही लोक जेलमध्ये दिसतील. आवश्यकता वाटल्यास राज्याच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि ईडीमार्फतही चौकशी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या जमिनीचा पैसा त्यांना मिळालाच पाहिजे .तो मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय आपण गप्प बसणार नाही. असे केसरकर यांनी स्पष्ट केले. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे .सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रातही आघाडीवर असणार आहे .असे केसरकर यांनी स्पष्ट केले. आपण 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.