सावंतवाडी नगरपालिकेत डास निर्मूलनासाठी फॉर्गिंग मशीन दाखल
देव्या सूर्याजींच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आले यश
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहर रोगराईपासून मुक्त ठेवण्यासाठी वाढत्या डासांच्या पार्श्वभूमीवर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेमध्ये दास निर्मूलन मोहिमेसाठी नवीन फॉगिंग मशीन रविवारी दाखल झाल्या. त्यामुळे आता सावंतवाडी वसई यांची डासांपासून मुक्तता होणार असून शहरात सोमवारपासून डास निर्मूलन फवारणीस सुरुवात होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर पांडुरंग नाटेकर यांनी दिली.
शहरवासीयांसाठी त्रासदायक असणारा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधल होत. प्रांताधिकारी हेमंत निकम यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. याबाबत तात्काळ कार्यवाही झाल्यामुळे रविवारी नगरपालिकेमध्ये डास निर्मुलन मोहीमेसाठी दोन हँण्डल मशीन्स व मोठ्या २ फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या आहेत. शहर डासमुक्त करण्यासाठी ही प्रभावी मोहीम ठरणार आहे. त्यामुळे युवा रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.