For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत उद्या घंटानाद आंदोलन

03:11 PM Jul 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत उद्या घंटानाद आंदोलन
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

पंधरा वर्षे आमदार व साडेसात वर्ष मंत्रिमंडळात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरील एसटी बस स्थानकावर गेल्या सात वर्षांपासून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे असल्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाठिंबा असून सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले.

सावंतवाडी एसटी बस स्थानकावर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सात वर्षांपूर्वी बस स्थानकाचे भूमिपूजन झाले होते. तरीसुद्धा प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बस स्थानकावर चिखल, खड्डे, ठिकठिकाणी पाणी, उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य, बैठक व्यवस्थेवर ठिपकणारे पाणी असल्यामुळे प्रवाशांना साधे बसताही येत नाही, अशी परिस्थिती बस स्थानकाचे झाली आहे. आमदार तथा मंत्री दीपक केसरकर पंधरा वर्षे आमदार आहेत तसेच साडेसात वर्ष महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळात आहेत. मात्र घोषणा आणि चुकीच्या वल्गना यापलीकडे केसरकर यांनी काही केलेलं नाही. प्रवाशांचा आवाज बनून गतवर्षी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आंदोलन छेडले होते. आता उद्या गुरुवार दि. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा हजारे यांनी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे. सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रूपेश राऊळ यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.