For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कासार्डे हायस्कूलात रंगला 'पालखी रिंगण' सोहळा !

02:52 PM Jul 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कासार्डे हायस्कूलात रंगला  पालखी रिंगण  सोहळा
Advertisement

तळेरे / वार्ताहर

Advertisement

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी रंगले विठूगजरात

तब्बल ८०० पेक्षा अधिक वर्षांची पंढरीच्या पायीवारीची परंपरा असलेल्या 'पालखी सोहळा आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी ११०० विद्यार्थीसह व सर्व शिक्षकांनी पालखी व रिंगण सोहळ्याचे हुबेहूब सादरीकरण केले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!! जय घोषांनी शालेय परिसर भक्तीसरात न्हावून निघाला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत आहे.वारीमध्ये आषाढी एकादशीचे खूपच मोठे महत्त्व आहे .शेकडो वर्षे सुरु असलेल्या वारीची परंपरा आणि त्यानिमित्ताने विविध संतांच्या पालख्या आषाढी एकादशीसाठी पंढरी दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ होतात. सलग १६ ते १८ दिवस शेकडो कि.मी.अनवाणी पायी प्रवास करीत ते पंढरपूरात पोहचतात.या आपल्या संस्कृतीचे,सांस्कृतिक ठेव्याचे महत्व विद्यार्थी वर्गाला समजण्यासाठी आणि पालखी सोहळ्यातील मॅनेजमेंट,सहनशीलता,ध्यास एकाग्रता,सातत्य,भक्तीभाव, शिस्तबद्धता,स्त्रीपुरूष समानता, विश्वबंधुता व एकरूपता असे अनेक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत या हेतूने कासार्डे विद्यालयात प्रतिवर्षी वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्रशालेतील छोट्या छोट्या विद्यार्थ्यानी विविध संत, वारकरी झेंडेकरी,टाळकरी,, पारंपरिक वेशात सजून तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थ्यिनींनी मैदानावर प्रतिकात्मक रिंगण सोहळा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. श्री.प्रभाकर नकाशे यांच्या बैलगाडीवर‌ रिंगण सोहळ्यातील भाविकांना दर्शन देणारा विठ्ठल आणि सोबत दळण दळणारी जानाईचा सजीव हालता देखाव्याने उपस्थितींचे विशेष लक्ष वेधून घेतले.

Advertisement

तर पालखीतील सोहळ्यातील वारकरी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून 'याची देही याची डोळा पालखी सोहळा अनुभवला. या उपक्रमात प्रशालेतील इ.५वी ते इ.९ वी मधील १५० पेक्षा अधिक छोटे वारकरी पारंपरिक पोशाखात दिंडीत सहभागी झाले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हुबेहूब वेशभूषा करीत विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा,संत एकनाथ ,संत सावतामाळी ,संत जनाबाई,संत कान्होपात्रा, संत मुक्ताई,संत गोरा कुंभार,संत चोखामेळा,संत नामदेव,संत एकनाथ, बहिणाबाई ,चोपदार,अशी अनेक संतमंडळी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अवतरली होती. पखवाज वादन इ.८ वीतील विद्यार्थी अश्मेश लवेकर यांनी केले.टाळ मृदुंगाच्या तालावर छोटे वारकरी मंडळी हातात भगवी पताका घेऊन पंढरीच्या विठुरायाच्या जयघोष 'करीत पालखी सोहळ्यात रंगून गेली होती.

याप्रसंगी संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे, मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आर व्ही. राऊळ, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि रिंगण सोहळ्यात सहभागी झालेले ११०० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.आषाढी एकादशी निमित्त आनंदाची वारी सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्तात्रय मारकड यांनी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकत पंढरीच्या वारीचे महत्व विद्यार्थ्यासमोर विशद केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.सोनाली पेडणेकर यांनी तर आभार प्रा.आर.व्ही राऊळ यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,विद्यालयाचे जेष्ठ शिक्षिका सौ.रजनी कासार्डेकर,सौ.सोनाली पेडणेकर,सांस्कृतिक विभागप्रमुख आर.व्ही.राऊळ,कला शिक्षक सागर पांचाळ,नवनाथ कानकेकर,प्रा.विनायक पाताडे,कु.प्रियंका सुतार,सौ.सविता जाधव,
सौ.ऋचा सरवणकर, व अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Advertisement
Tags :

.