For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारायण राणेंना मारलेली मिठी ही माझी मोठी राजकीय चूक !

01:16 PM May 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
नारायण राणेंना मारलेली मिठी ही माझी मोठी राजकीय चूक
Advertisement

 आता केसरकरांनीही तीच चूक केली ;संदेश पारकर

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

नारायण राणे यांना मी दहा वर्षांपूर्वी मारलेली मिठी माझी मोठी राजकीय चूक होती .ही चूक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली असून त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. त्यांचेही राजकीय नुकसान होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. त्यांनी या निवडणुकीत नारायण राणे पराभवाची हॅट्रिक करणार असून खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करून केंद्रात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री असणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. पारकर म्हणाले ,दहा वर्षांपूर्वी मी राणे मिठी मारली ती माझी मोठी चूक होती. त्यामुळे माझे राजकीय नुकसान झाले परंतु ,गेल्या सहा वर्षात मी सुधारणा केली .माझी राणे यांच्या प्रवृत्ती बरोबर लढाई सुरू आहे ती सोडलेली नाही राणे त्यावेळी काँग्रेसमध्ये आले होते त्यामुळे त्यांच्याशी तडजोड करावी लागली. ही राणेशी तडजोड नव्हती तर काँग्रेसच्या विचारधारेशी तडजोड होती . त्यांच्याशी तात्विक विरोध सुरू होता. परंतु त्यांना मारलेली मिठी माझे राजकीय नुकसान करणारी ठरली. ही चूक आता केसरकर यांनी केली आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे त्यांचेही राजकीय नुकसान होणार आहे. केसरकर राणेंच्या दहशतीच्या विरोधात आवाज उठवत होते . परंतु कुणाच्या दबावामुळे त्यांनी मिठी मारली हे समजत नाही त्यांचा जनाधार संपल्यामुळे कदाचित त्यांनी ही मिठी मारली असावी परंतु सावंतवाडीच्या जनतेला त्यांची ही भूमिका पटलेली नाही . त्यामुळे या निवडणुकीत राणेंच्या विरोधात मतदान करून सावंतवाडी मतदारसंघातील जनता केसरकर यांना प्रत्युत्तर देणार आहे असेही पारकर म्हणाले.

Advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी गांधी चौकात शेतकरी नेते वचन केसरकर यांची सभा आयोजित केली होती . परंतु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रडीचा डाव खेळून या ठिकाणी प्रशासनावर दबाव आणून नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा लावली असा आरोप तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे . गांधी चौकात रविवारी होणाऱ्या सभेचे बुकिंग केले होते मात्र या ठिकाणी केसरकर यांनी राणेंच्या प्रचारासाठी सभा लावली. त्यांनी प्रशासनावर दबाव आणला केसरकर यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे ते आमची सभा होऊ देत नाही या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे केसरकर यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे राऊळ यांनी स्पष्ट केले यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे राऊळ म्हणाले.

Advertisement
Tags :

.