सावंतवाडी पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करा
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे पालकमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी
नगरपरिषदेतील चतुर्थ श्रेणीतील 17 कामगारांना वारसाहक्क कायद्यानुसार कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या लाड पागे शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करुन घेण्यात यावे असे निवेदन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांचे प्रतिनिधी सुनिल परब ,संदीप पाटील, नितीन कदम यांनी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंञी तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत दिले. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णायाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बीड, गेवराई, कराड, शिर्डी, रत्नागिरी, देवगड या ठिकाणच्या सफाई कामगारांनाऔरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार समाविष्ट करून घेण्यात आले आहे.यावेळी .पालकमंत्री नितेश राणे यांनी नगरपरिषद निवडणूक आचारसंहिता 21 डिसेंबर रोजी समाप्त होत असुन त्यानंतर लगेच सावंतवाडीतील सफाई कामगारांना समाविष्ट करुन घेण्यात येईल असे स्पष्ट केले.या शिष्टमंडळात स्वीय सहायक मनोज वाघमारे व गोपाळ सावंत सहभागी होते. त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील साकव दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांना विनंती करण्यात आली. या साकवाचे काम डिसेंबर अखेर पर्यंत सुरु होईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिले .