For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना नारायण राणे यांच्या पाठीशी

04:25 PM May 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना नारायण राणे यांच्या पाठीशी
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता दुरदृष्टी असलेला अभ्यासू नेता पुन्हा जिल्ह्यात होणे कठीण आहे. कोकणासह जिल्ह्याच्या विकासासाठी नारायण राणे यांना विजयी करणे आवश्यक आहे. त्यामुळे विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना नारायण राणे यांच्या पाठीशी असुन त्यांच्या मोठ्या मताधिक्यासाठी शेतकरी गावागावत प्रचारात उतरणार अशी ग्वाही विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यानी नारायण राणे यांना दिली.मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेने कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मंगेश तळवणेकर बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण देऊलकर, प्रकाश सावंत, नारायण कारिवडेकर, अजय सावंत, संतोष हरमलकर, भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक, प्रकाश जाधव, सागर सावंत, भरत गंगावणे, बाळकृष्ण नाईक, संतोष नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी मंगेश तळवणेकर म्हणाले, नारायण राणे यांनी प्रथम निवडून आल्यापासून कोकणातील गोरगरीब जनतेला वेळोवेळी मदत केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषीत करुन घेतला, कोकणातील पर्यटन स्थळांचा विकास, रस्त्यांचे रुंदीकरण, नळ योजना सुरु केल्या. ज्यावेळी शासकीय योजनांचा लाभ येथील लोकांना मिळत नव्हता, त्यावेळी कोकणातील गोरगरीबांना गरजूंना, आजारी व्यक्तींना त्यांनी भरपुर आथिर्क मदत दिली हे जिल्हयातील जनतेने पाहिलेले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात नारायण राणे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केलेले आहे. आता त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनीही आपल्या गावातील लोकांना समजावून सांगून नारायण राणे यांना लोकसभेत प्रचंड मतांनी विजयी होण्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसेच पुर्वी एका विधानसभा मतदार संघापुरते मतदान करण्यास मतदारांना मिळत होते. त्यामुळे जिल्हयात राणेंचे कार्य पाहता त्यांना मतदान करण्याची संधी सर्वांना मिळाली असल्याचे मंगेश तळवणेकर यांनी सांगितले. यावेळी नारायण राणे यांनी सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यात आपण बांधील असल्याचे सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.