For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर मेणबत्ती घेऊन आंदोलन करू ; सोनाली मेस्त्रींचा इशारा

04:28 PM Jul 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तर मेणबत्ती घेऊन आंदोलन करू   सोनाली मेस्त्रींचा इशारा
Advertisement

इन्सुलीत वीज वितरणचे सबस्टेशन असूनही महिनाभर विजेचा लपंडाव

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

वीज वितरणचे सबस्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा वीज वितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिनाभर विजेचा लपंडाव सुरू आहे. इन्सुली मध्ये सबस्टेशन असून जर त्या गावात विजेचा नियमित सुरू ठेवू शकत नसल्याने संबंधित विभागाचे अधिकारी काम करण्यात योग्य नाही. त्यामुळे नियमित बिले भरून सुद्धा रात्रीच्या रात्री काळोखात काढावे लागत आहे. येत्या चार दिवसात जर इन्सुली गावातील विजेच्या समस्या मार्गी न लागल्यास मेणबत्ती घेऊन बांदा, इन्सुली व कुडाळ कार्यालयात बसून आंदोलन करावे लागेल असा इशारा इन्सुली ग्रामपंचायत सदस्या सोनाली संतोष मेस्त्री यांनी दिला आहे. जर तातडीने प्रश्न मार्गी न लागल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.वीज वितरण विभागाचे इन्सुली येथे सबस्टेशन आहे. तेथूनच बऱ्याच गावात वीजपुरवठा केला जातो. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून इन्सुली गावातच वीजपुरवठा नियमित खंडित असतो. जर इन्सुली मध्ये सबस्टेशन असूनही जर एक किलोमीटर परिसरात वीज पुरवठा संबंधित विभाग सुरळीत ठेवू शकत नाही. गेली अनेकवर्षे अशी विजेची समस्या नव्हती मात्र संबंधित विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुलीवासीयांना अंधारात रहावे लागत आहे. मुख्य वीज प्रवाह करणाऱ्या लाईनवरील झाडी न साफ केल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत जर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही इन्सुली ग्रामस्थ बांदा, इन्सुली व कुडाळ कार्यालयात येऊन मेणबत्ती आंदोलन करणार असा इशारा ग्रामपंचायत सदस्या सोनाली संतोष मेस्त्री यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.