'तरूण भारत 'कॉलेज कट्टा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल; गोखले कॉलेजमधील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर प्रतिनिधी
कॉलेज कट्टा... प्रत्येकाच्याच मनात एक कलाविष्कार दडलेला असतो . हा कलाविष्कार आपल्या स्नेही सोबत्यां समोर सादर करणे ही देखील प्रत्येकाच्या मनात इच्छा असते .पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही . तशी संधीही मिळत नाही.त्यामुळे मनातल्या मनातच अनेकांना हा कलेचा अविष्कार दाबून ठेवावा लागतो . पण कोल्हापुरातील गोपाल कृष्ण गोखले महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांच्यातील कलाविष्कार जल्लोषाच्या वातावरणात सादर केला .त्यांच्यावर कौतुकाचा पुरस्काराचा वर्षाव झाला .तब्बल पाच तास गोखले महाविद्यालयाचा लायब्ररी हॉल हशा टाळ्या आणि कौतुकाच्या चेहऱ्यांनी खुलून गेला . याला निमित्त ठरला तरुण भारत कॉलेज कट्टा. युवा वर्गातील कला गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा तरुण भारतचा हा उपक्रम उपस्थितांची दाद घेऊन गेला.
पहा VIDEO>>> गोखले कॉलेजमधील तरुण भारत 'कॉलेज कट्टा' कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
कॉलेज म्हणजे नवे जग, आपले ध्येय ठरवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे दिवस...तसेच मौजा मस्तीचे सुध्दा डोळयात फुलपंखी स्वप्ने घेऊन वावरणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तरूण भारतने ‘कॉलेज कट्टा' च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि तब्बल पाच तास रंगलेल्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही मनमुराद आनंद लुटला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, महापालिका माजी परिवहन समिती सभापती अजितराव मोरे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य प्रा. एन. टी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एन. मोरे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. प्रा. पी. बी. झावरे, प्रा. आर. बी. सुतार यांनी संयोजन केले. तर या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून बेळगाव सोशल मीडिया विभाग, जाहिरात प्रमुख अमित कोळेकर यांनी काम पहिले.
कॉलेज कट्टा म्हंटले की तरूणाईच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. कॉलेज कट्टा हे व्यासपीठ केवळ मनोरंजनाचेच नाही तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आहे. याची सुरूवात ‘फुगे‘ फोडण्याच्या अनोख्या खेळाने झाली. दोनपैकी एकाने वेगाने फुगा फुगवून दुसऱ्याने तो फोडला पाहिजे, ही या खेळाची अट होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या चुरशीने यामध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर हात न लावता रिंगमध्ये जावून बाहेर येण्याच्या स्पर्धेने तर स्पर्धकांना चक्रावून सोडले. प्रारंभी दहा स्पर्धकांनी हात न लावता रिंगमध्ये जावून पुन्हा बाहेर येण्याचा राऊंड पूर्ण केला. पण त्यानंतर आपल्याजवळ रिंग असताना संगीत थांबू नये यासाठी मात्र स्पर्धकांची कसोटी लागली. रिंगमधून बाहेर येताना आपल्याजवळ संगीत थांबू नये यासाठी विद्यार्थ्यांची उडालेली धांदल वेगळा आनंद देऊन गेली.
कॉलेज कट्ट्याच्या व्यासपीठावर गायन आणि वाद्यवादन स्पर्धाही रंगली विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात गाणे पेश करत आपले कौशल्य दाखविले. वक्तृत्व स्पर्धेसाठी गोपाळकृष्ण गोखले कॉलेजची स्थापना कोणी केली या विषयावर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले. नृत्य अर्थात डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मिमिक्रीने हास्याची लकेर उमटविली. मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. ग्रुप डान्सने या स्पर्धेची सांगता झाली. तरुण भारतच्या या कॉलेज कट्याला टायटनचे जय कामत यांचे प्रायोजकत्व तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांनी ‘तरुण भारत‘चे वरिष्ठ व मुख्य प्रतिनिधी सुधाकर काशिद, शहर जाहीरात व्यवस्थापक मंगेश जाधव, प्रशासकीय अधिकारी राहूल शिंदे, शहर प्रतिनिधी अहिल्या परकाळे, बेळगाव तरूण भारत सोशल मिडिया विभागप्रमुख तौसीफ मुजावर, जाहिरात प्रमुख अमित कोळेकर, कॅमेरामन अंकुश कामत, निलेश मोरे, सुरज पाटील, सोशल मिडिया कोल्हापूर प्रतिनिधी कल्याणी आमणगी, अभिजित खांडेकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. बक्षीस वितरण शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, ‘तरुण भारत संवाद वरिष्ठ व मुख्य प्रतिनिधी सुधाकर काशिद, शहर जाहिरात व्यवस्थापक मंगेश जाधव, प्रशासकीय अधिकारी राहुल शिंदे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य प्रा. एन. टी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एन. मोरे, सोशल मीडिया प्रमुख तौसिफ़ मुजावर, सोशल मीडिया जाहिरात प्रमुख अमित कोळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गोखले कॉलेजचे डॉ. सी. आर. चौगुले, डॉ. सी. पी. कुरणे, डॉ. ए. ए. कुलकर्णी, प्रा. आर. बी. सुतार, प्रा. एस. आर. घाटगे, प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. डी. के. नरळे, प्रा. डी. के. डाके, प्रा. एम. एल. धनवडे, प्रा. ए. यु. पडवळ, प्रा. के. एस. काईंगडे, प्रा. डी. व्ही. किलकिले, तरूण भारत संवाद जाहीरात सिनिअर एक्झिकेटीव्ह रणजीत कणसे, सदानंद पाठक आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मिळवली बक्षिसे
‘तरूण भारत कॉलेज कट्टा‘चे शीर्षक गीत सादर करणारे श्रीराम खाडे याला बक्षिस देण्यात आले. तेजू गोंगाणे, निलम यादव, अमन सय्यद, श्रीराम खाडे, सुशांत शिंदे, समिक्षा पाटील, कुमार, परिणाज मुजावर, चायना शिंदे, अंकिता, प्रणिता बागडी, आकाश, सुरज, तुषार पटोले, दक्ष जाधव. मुलांच्या ग्रुपने सर्वसाधारण विजेते पदाची ट्रॉफी जिंकली.