केवळ 180 सेकंदात लक्ष्यभेद
‘बंकर बस्टर’ बॉम्ब आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर
अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या अणु सुविधांना अचूक लक्ष्य केले. या हल्ल्यासाठी अमेरिकेने बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स आणि नेव्हीच्या पाणबुड्यांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. हे बॉम्बर्स हायटेक बंकर-बस्टर बॉम्बने सुसज्ज होते, तर पाणबुड्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होत्या. फोर्डो येथील इराणचे अणुतळ उद्ध्वस्त करण्यासाठी सहा ‘बंकर बस्टर’ बॉम्ब वापरले. याशिवाय, नतान्झ आणि इस्फहानवर हल्ला करण्यासाठी अमेरिकन पाणबुड्यांमधून सोडलेल्या 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर केला. इराणच्या अणु क्षमता कमकुवत करणे हा हल्ल्याचा उद्देश होता. अमेरिकेने हा संपूर्ण हल्ला 180 सेकंदात केला.
►सर्वप्रथम, बी-2 ने क्यूओएम क्षेत्राजवळ 40,000 फूट उंचीवरून जीबीयु-57 बॉम्ब टाकला.
►पुढच्या 10 सेकंदात जीपीएस आणि गायडन्सच्या मदतीने बॉम्ब टाकण्यास सुरुवात झाली.
►25 सेकंदांनंतर इराणच्या आकाशात सुपरसॉनिक वेगाने आवाज येऊ लागले.
►40 व्या सेकंदात बॉम्बने फोर्डो साइटच्या वरच्या टेकडीवर हल्ला केला.
►41 व्या सेकंदात बॉम्ब शेकडो फूट उंचीवरील खडकात घुसला.
►44 व्या सेकंदात फोर्डोच्या भूमिगत कंपाऊंडमध्ये वॉरहेडचा स्फोट झाला.
►60 व्या सेकंदात प्रचंड शॉकवेव्हमुळे एन्रिचमेंट चेंबर व शाफ्ट कोसळले.
►90 व्या सेकंदात भूकंपीय सेन्सर्सनी संपूर्ण प्रदेशात स्फोटाची खात्री केली.
►120 व्या सेकंदात उपग्रह आणि ड्रोन फीडने नुकसानाची पुष्टी केली.
►180 व्या सेकंदात बी-2 रडारला ओळखल्यानंतर माघारी परतले.
कोणती शस्त्र वापरली ?
6 बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स
व्हर्जिनिया/एनए-क्लास एन-पाणबुड्या
12 जीबीयु-57 बंकर बस्टर
30 टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे
हवाई श्रेष्ठतेसाठी एफ-22 रॅप्टर्स
एफ-35 लाइटनिंग आयआयएस