आरपीडी महाविद्यालयात ‘तरंग 2 के 25’ महोत्सवाची सांगता
बेळगाव : आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात ‘तरंग 2 के 25’ या महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवामध्ये 876 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील सर्वसाधारण अजिंक्यपद बालिक आदर्श शाळेने पटकाविले. कबड्डीमध्ये संभाजी हायस्कूल, बैलूरने प्रथम, मराठा मंडळ हायस्कूल किणये यांनी द्वितीय, मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये माध्यमिक हायस्कूल बेळवट्टी प्रथम, बालिका आदर्शने द्वितीय, व्हॉलीबॉलमध्ये स्वाध्याय हायस्कूलने प्रथम, टिळकवाडी हायस्कूलने द्वितीय, व्हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेत बालिका आदर्शने प्रथम तर रणकुंडये हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळविला.
रस्सीखेच स्पर्धेत मुलींच्या विभागात ज्योती हायस्कूलने प्रथम, एसकेई हायस्कूलने द्वितीय, मुलांच्या गटात लिटल हायस्कूलने प्रथम, एसकेई मराठी हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. 4×100 मीटर वैयक्तिक स्पर्धेत मुलांच्यामध्ये समर्थ वाघुकर प्रथम, नैतिक मजुकर द्वितीय, छायाचित्रे अनुक्रमे दर्शन गावडे प्रथम, आतिश देसाई द्वितीय, स्वयंम जिनारली तृतीय यांनी बक्षिसे मिळविली. टाकाऊपासून टिकाऊ अनुक्रमे प्रथम प्रांजल, द्वितीय सृष्टी, तृतीय अन्वयीत, मुखचित्र स्पर्धेचे ऋतुजा सुतार प्रथम, श्रीयन नलवडे द्वितीय व पूर्वी इंचल तृतीय क्रमांक मिळविला. नृत्य स्पर्धेत एसकेई मराठी हायस्कूल प्रथम, लिटल हायस्कूल द्वितीय, चिंतामणराव हायस्कूल तृतीय यांनी बक्षिसे मिळविली. प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई संस्थेचे खजिनदार श्रीनाथ देशपांडे, आरडीपी पदवीपूर्व कॉलेजच्या मॅनेजिंग कमिटी चेअरपर्सन धनश्री आजगावकर, व्हाईस चेअरपर्सन नित्यानंद करमळी, एसकेई संस्थेच्या सचिव लता कित्तूर, आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य तृप्ती शिंदे, प्रा. ज्योती सत्यगिरी उपस्थित होत्या.