तारा सुतारिया नव्या रिलेशनशिपमध्ये
अरुणोदय सिंहला करतेय डेट
आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्यावर अभिनेत्री तारा सुतारियाला नवा जोडीदार मिळाला आहे. तारा आता अभिनेता अरुणोदय सिंहला डेट करत आहे. दोघांमध्ये उत्तम केमिस्ट्री देखील दिसून येत आहे. अरुणोदय सिंह हा घटस्फोटित आहे. 2016मध्ये त्याने ली एन एल्टनसोबत विवाह केला होता, परंतु 2019 मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. तर तारा आणि आदरने 2022 मध्ये स्वत:चे रिलेशनशिप संपुष्टात आणले होते.
तारा आणि अरुणोदय मागील दीड वर्षांपासून परस्परांना डेट करत आहेत. ताराच्या पालकांनीही अरुणोदयला पसंती दर्शविली आहे. तारा आणि अरुणोदय अनेकदा डेट्सवर जात असल्याचे समोर आले आहे. अरुणोदय हा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री अर्जुन सिंह यांचा नातू आहे.
तारा स्वत:चे हे रिलेशनशिप खासगी ठेवू इच्छित असल्याने ती याबाबत अधिक चर्चा इच्छित नाही. तारा आणि अरुणोदय हे अलिकडेच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसून आले होते. ताराने यापूर्वी आदर जैनला डेट केले होते आणि 2020 मध्ये स्वत:च्या त्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली होती. परंतु तिचे हे नाते फार काळ टिकू शकले नव्हते.