वीर पहाडियाला डेट करतेय तारा
सारा अली खानचा एक्स बॉयफ्रेंड
आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्यावर अभिनेत्री तारा सुतारियाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलले आहे. तारा सुतारिया आता अभिनेता वीर पहाडियाला डेट करत आहे. वीर हा अभिनेत्री सारा अली खानचा एक्स बॉयफ्रेंड आहे.
तारा आणि वीरने स्वत:च्या या रिलेशनशिपविषयी अद्याप पुष्टी केलेली नाही. परंतु दोघेही अनेकदा डेटवर जात असून परस्परांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मार्च महिन्यात तारा आणि वीरने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी देखील दोघेही एकत्र दिसून आले होते. वीर पहाडियापूर्वी तारा ही आदर जैनला डेट करत होती. परंतु जानेवारी 2023 च्या आसपास दोघांनी ब्रेकअप केला होता. आदर जैनने पुढील काळात अन्य युवतीशी विवाह केला होता. तर नंतर ताराचे नाव अभिनेता अरुणोदय सिंहसोबत जोडले गेले होते. परंतु ताराने ही केवळ अफवा असल्याचा दावा केला होता. वीर पहाडियाने अलिकडेच स्काय फोर्स या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.