महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुडचडेत तन्वी वस्तच्या आवळल्या मुसक्या

11:29 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बँक कर्मचारी भासवून केले कारनामे : कायम ठेवीच्या नावाने अनेकांना गंडविले,कुडचडे येथील सेंट्रल बँकमधील कारभार

Advertisement

कुडचडे : कुडचडेत मंगळवार दि. 19 रोजी सेंट्रल बँक कुडचडे शाखेतील खात्यातून ज्येष्ठ नागरिकांना दिशाभूल करून लाखों ऊपयांचा चुना लावल्याची माहिती उघड झाल्यामुळे कुडचडेत गोंधळ उडाला होता. गेल्या मंगळवारपासून सुऊ असलेल्या या चर्चेला काल सोमवारी पूर्ण विराम मिळाला आणि साऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणातील संशयित आरोपी सौ. तन्वी वस्त हिला भारतीय न्याय संहितंच्या कलम 305, 318 नुसार काल दुपारी अटक केल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली. गेल्या मंगळवारी माजलेल्या गोंधळानंतर बुधवारपासून सेंट्रल बँकेत खाते असलेल्या लोकांनी आपापल्या खात्याची माहिती बँकेतून घेतली, तेव्हा बऱ्याच जणांना खात्यातील पैसे दिशाभूल करून त्याच बँकेतील अन्य एका खात्यात ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. यात व्हिजन इंडिया सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडच्या माध्यमातून बँकेची प्रगती होण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रतिनिधीकडून हा गैरकारभार झाल्याचे उघडकीस आले.

Advertisement

अनेकांच्या खात्यातून पैसे गायब

या संबंधि बऱ्याच जणांनी आपले पैसे खत्यातून गायब झाल्यामुळे सेंट्रल बँकेच्या मॅनेजरकडे तक्रारी नोंद केल्या होत्या. त्याचबरोबर पोलिसांनी अटक केलेल्या तन्वी वस्तने काही खातेधारकांना ज्यांचे पैसे दिशाभूल करून ट्रान्सफर केले होते, त्यांना गुऊवारी सदर रक्कमेचे  धनादेश दिल्याचीही माहिती हाती आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सेंट्रल बँकेचे उच्च पातळीवरील अधिकारीही कुडचडेत आले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील बँक असल्यामुळे कुडचडेतील व्यापारी व खाजगी संस्थांची या बॅंकेत खाती आहेत. या घटनेनंतर कुडचडेतील लोकांकडून हा घोटाळा करणाऱ्या महिलेला अटक व्हायलाच पाहिजे, अशी मागणी गेले सहा दिवस चालू होती. त्याला काल सोमवारी पूर्णविराम मिळाला.

लाखो रुपये घेऊन दिल्या ‘डुप्लिकेट सर्टिफिकेट्स’

अधिक माहितीनुसार तन्वी ही बँक कर्मचारी नसतानाही बँकेत वावरायची. काही वयस्क व कमी शिकलेल्या खातेधारकांच्या घरी जाऊन त्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून लाखो ऊपये घेऊन त्या कायम ठेवी ठेवुया असे सांगून पैसे घेत होती. या व्यवहाराची प्रमाणपत्रेही तिने संबंधितांना दिली. मात्र त्या ‘डुप्लिकेट सर्टिफिकेट’ असल्याचे उघड झाल्याने ही फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रमाणपत्रांवर बँकेचा शिक्का असल्यामुळे लोक बँकेतील मॅनेजरकडे संशयित दृष्टीने पाहू लागले होते. तसेच बँक कर्मचारीही यात सामील असू शकतात, असा संशयही घेण्यात आला. मात्र आता तन्वी वस्तचे या साऱ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे.

कर्मचारी नसतानाही बँकेत कशी?

बँकेच्या कर्मचारी नसताना बँकेत बसण्यास तिला कोणी परवानगी दिली? असा सवाल खातेधारकांनी उपस्थित केला होता. कुडचडेतील एका प्रतिष्ठित घरण्यातील ती सून असून लोकांना लुबाडण्याचे कृत्य केल्याबद्दल कुडचडेत प्रचंड नाराजी पसरली आहे.

निरीक्षक वैभव नाईक यांची बदली

गेल्या आठ दिवसापासून कुडचडे पोलिसस्थानकाचे निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुऊ होती. त्या अनुषंगाने कुडचडेतील जनता आरोपीच्या अटकेची आतुरतेने वाट पाहत होते, पण अचानक कुडचडेचे निरीक्षक वैभव नाईक यांची बदली दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी राखीव पोलिस विभागात केली. कुडचडे पोलिसस्थानकाचा ताबा निरीक्षक तुकाराम सावंत यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी तन्वी वस्त हिला या प्रकरणातील संशयित म्हणून अटक करण्याचे सोपस्कार पूर्ण केले.

तन्वीच्या विरोधात तक्रार अन कारवाई

व्हडलेमळ-काकोडा येथील रोझालीना कोरिया अँथनी डायस या महिलेने कुडचडे पोलिसस्थानकात तक्रार नोंद केली होती. या तक्रारीत सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या कुडचडे शाखेत व्हिजन इंडियाच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या तन्वी वस्ते हिने आपले सोन्याचे दागिने तशाच प्रकारचा धातू वापरून बदलण्यात आल्याचे म्हटले आहे. सोन्याच्या दागिन्यामध्ये एक नेकलेस, दोन सोनसाखळ्या, पाच बांगड्या, दोन ब्रेसलेट, दोन अंगठ्या, एक कर्णफुलांची जोडीचा समावेश आहे. या सोन्याच्या दागिन्याची किंमत सुमारे 25 लाख रूपये आहे.

‘ब्युटी क्विन’ बनली ‘ठग ऑफ कुडचडे’

रोझालीना हिच्या खात्यातील सुमारे साडेपाच लाख रूपये तन्वीने तिच्याच मोबाईलचा वापर करून आपल्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. बँकेत खाते असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील कामकाजात मदत करण्याचा बहाणा करून त्यांचे मोबाईल घेतले जात असे आणि त्याद्वारे त्यांच्या खातील पैसे आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले जायचे.  तन्वी वस्त कुडचडेतील प्रतिष्ठित घरण्यातील सून असून तिने मिस एशिया पॅसिफिक 2022 चे विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर ग्लॅमर पिपल्स च्योईस स्पर्धेतही आपली चमक दाखविली होती. आता फसवणुकीतही आपले कारनामे दाखविले, अशी चर्चा सध्या कुडचडेसह सर्वत्र सुरु आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article