तन्वी शर्माला रौप्यपदक
06:15 AM Oct 20, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Guwahati: India’s Tanvi Sharma after winning silver medal in women’s singles category at the BWF World Junior Championships, at National Centre of Excellence, in Guwahati, Assam, Sunday, Oct. 19, 2025. (PTI Photo) (PTI10_19_2025_000162B)
Advertisement
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
Advertisement
भारताची कनिष्ठ बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अंतिम फेरीत पराभूत झाल्याने साकार होऊ शकले नाही. थायलंडच्या अनयापत फिचितप्रीचासकने तिला अंतिम फेरीत हरवून सुवर्णपदक पटकावले आणि तन्वीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Advertisement
16 वर्षीय तन्वीने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून माजी वर्ल्ड नंबर वन सायना नेहवाल आणि अपर्णा पोपट यांच्या पंक्तीत स्थान मिळविला होता. अंतिम फेरी गाठणारी ती भारताची तिसरी महिला बॅडमिंटनपटू असून थायलंडच्या दुसऱ्या मानांकित पी. अनयापतकडून 7-15, 12-15 अशी पराभूत झाली. तिने मिळविलेले पदक हे गेल्या 17 वर्षातील भारताचे पहिले पदक आहे. सायना नेहवालने 2008 मध्ये सुवर्ण व 2006 मध्ये रौप्य आणि अपर्णाने 1996 मध्ये रौप्यपदक मिळविले होते.
Advertisement
Next Article