दहावी परीक्षेत कोलगाव हायस्कूलमधून तन्वी माईंणकर प्रथम
03:20 PM May 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
पारस राऊळ द्वितीय तर रोशनी बटवलकर तृतीय
Advertisement
ओटवणे प्रतिनिधी
कोलगाव येथील कोलगाव माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक तन्वी आशिष माईंणकर (८४.६०%,), द्वितीय क्रमांक पारस संतोष राऊळ (८०.६०%,) तर तृतीय क्रमांक रोशनी संतोष बटवलकर (७७.४०%) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक अरविंद मेस्त्री आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
Advertisement
Advertisement