तन्वी खन्नाला उपविजेतेपद
वृत्तसंस्था / जयपूर (राजस्थान)
2025 च्या स्क्वॅश इंडिया टूरवरील येथे झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत महिलांच्या एकेरीत भारताची स्क्वॅशपटू तन्वी खन्नाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शुक्रवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्याला शौकिनांची गर्दी होती. इजिप्तची टॉप सिडेड नूर खाफगीने भारताच्या तन्वी खन्नाचा 3-1 (11-3, 5-11, 11-5, 12-10) अशा गेम्समध्ये पराभव करत उपविजेतेपद पटकाविले. मात्र इजिप्तच्या नूर खाफगीने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. भारताच्या 29 वर्षीय तन्वी खन्नाला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तन्वीने आपल्याच देशाच्या रतिका सिलेनचा 3-0 (11-5, 11-3, 11-1) अशा गेम्समध्ये पराभव केला. भारताच्या तन्वी खन्नाने आपल्याच देशाच्या रतिका सिलानचा 3-0 (11-5, 11-3, 11-1) अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. जयपूरच्या स्क्वॅश टूरने ही स्पर्धा आयोजित केली असून एचसीएलने ती पुरस्कृत केली आहे.