कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडूची इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातली भरारी

06:30 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात निर्यातीत एका राज्याने स्पृहणीय कामगिरी नोंदवली आहे. ते राज्य आहे तामिळनाडू हे. या राज्याने आर्थिक वर्ष 2025 मध्ये निर्यातीत मागच्या तुलनेत भरभक्कम वाढ नोंदवली आहे. तामिळनाडू या राज्याच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या राज्याने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे कार्य केले आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीतला सर्वाधिक वाटा उचलण्यात तामिळनाडू हे राज्य आघाडीवर राहिले असल्याची बाब समोर आली आहे. या राज्याने या योगे उद्योग क्षेत्राकरीता भरीव असे योगदान देत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये तामिळनाडूने एकुण निर्यातीत 53 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या या कामगिरीचे कौतुक व्हावेच लागेल.

Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात विविध राज्यांचा वाटा दिसून येत असला तरी या साऱ्यात तामिळनाडू आता वेगाने या क्षेत्रात पुढे सरसावताना दिसते आहे. राज्यात असणाऱ्या विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या योगदानामुळे निर्यातीत झेप घेणे राज्याला शक्य झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये 53 टक्के इतकी वाढीव निर्यात करण्यात तामिळनाडूने यश मिळवले आहे. 2024-25 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची राज्यातून निर्यात 14.65 अब्ज डॉलर्सची झालेली आहे. 2023-24 आर्थिक वर्षात हीच निर्यात 9.56 अब्ज डॉलर्सची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात झाली होती. मागच्या वर्षी तामिळनाडूने इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 78 टक्क्यांची वृद्धी नेंदवली होती. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5.37 अब्ज डॉलर्सची तामिळनाडूने निर्यात केली होती. आर्थिक वर्ष 2025 मध्ये तामिळनाडूने यायोगे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे. एवढेच नाही तर भारतानेही इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत लक्षणीय वाढही नोंदवली आहे. 41 टक्के इतकी वाढ यंदा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत दिसली आहे, हेही यश नसे थोडके. तामिळनाडू राज्याच्या कामगिरीचे राज्याचे उद्योग मंत्री टीआरबी राजा यांनी कौतुक केले असून राज्याची कामगिरी उठून दिसणारी नक्कीच झाली आहे, असे म्हटले आहे.

Advertisement

2024-25 मध्ये पाहता कर्नाटक हे राज्य दुसऱ्या नंबरवर इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत राहिले आहे. या राज्याने 7.85 अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात करण्यात यश मिळवलं आहे. राष्ट्रीय निर्यातीच्या वाट्यात पाहता कर्नाटकाचा वाटा 22 टक्के दिसून आला आहे. यानंतर उत्तर प्रदेशने 5.26 अब्ज डॉलर्सची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात करुन तिसरा नंबर पटकावला आहे. राष्ट्रीय निर्यातीत अशाप्रकारे उत्तर प्रदेशने 15 टक्के वाटा उचलला आहे. यानंतर महाराष्ट्राने 3.51 अब्ज डॉलर्सची, गुजरातने 1.85 अब्ज

डॉलर्सची आणि तेलंगाणाने 641.56 दशलक्ष डॉलर्सची निर्यात करत योगदान दिले आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 80 टक्के आयफोन्स भारतातून अमेरिकेत पाठवले गेले आहेत. आयफोन बनवणारी एकमेव कंपनी अॅपलने सर्वोच्च कामगिरी करण्याचा मान मिळवला आहे. सर्वाधिक आयफोन्सची निर्यात अमेरिकेला केली आहे. अमेरिकेत सध्या जे आयफोन्स वापरात आहेत ते भारतात बनवलेले आहेत. आयफोन 16 हा फोनही भारतात बनवला गेला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स व फॉक्सकॉन यांची 1.5 ट्रिलीयनची निर्यात झाली आहे. मागच्या तुलनेत ही निर्यात दुप्पट असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर आयफोन्सच्या बाबतीत विचार करता जागतिक उत्पादनातील एकंदर वाट्यामध्ये भारताचा वाटा 18 ते 20 टक्क्यांवर पोहचला आहे. ही कामगिरीसुद्धा तशी वाखाणण्यासारखी म्हणायला हवी. तामिळनाडूचा विचार केल्यास 14 निर्मिती कारखाने हे एकट्या याच राज्यात आहेत. फॉक्सकॉन, पेगाट्रॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स व विस्ट्रॉन यांनी उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. फ्लेक्स, होन है प्रीशीजन इंडस्ट्री कंपनी, लिंगी आयटेक, ऑन सेमीकंडक्टर, तैवान सरफेस माऊटिंग टेक्नॉलॉजी व झेन डिंग टेक्नॉलॉजी हे पुरवठादार म्हणून उद्योगात योगदान देत आहेत.

-दीपक कश्यप

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article