महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडू, कर्नाटक, केरळ विजयी

06:22 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/काडाप्पा (आंध्रप्रदेश)

Advertisement

2024 च्या हॉकी इंडियाच्या कनिष्ट पुरूष आणि महिला दक्षिण विभागीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेतील चौथ्या दिवशी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश यांनी विजय नोंदविले.

Advertisement

महिलांच्या विभागातील झालेल्या पहिल्या सामन्यात तामिळनाडूने पुडूचेरीचा 15-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. तामिळनाडूतर्फे कर्णधार आर. मुमांजाने 6 गोल, रुबीनी नित्याने 4 गोल केले. लेखाश्री, दर्शनी, जयशालिनी, काव्या व अक्षता यांनी प्रत्येकी एक गोल केला. महिलांच्या विभागातील दुसऱ्या सामन्यात केरळने तेलंगणाचा 5-1 असा पराभव केला. केरळ संघातर्फे लक्ष्मीने 2 गोल तर अनामिका, कर्णधार पियुशा व शेरीन यांनी प्रत्येकी एक गोल केला. तेलंगणातर्फे एकमेव गोल अक्षयाने केला. महिलांच्या विभागातील तिसऱ्या सामन्यात आंध्रप्रदेशने कर्नाटकाचा 3-1 असा पराभव केला. आंध्रप्रदेशतर्फे श्री विद्याने 2 गोल तर अंकिताने 1 गोल केला. कर्नाटकातर्फे एकमेव गोल पी. मनीषाने नोंदविला.

पुरूषांच्या विभागातील पहिल्या सामन्यात कर्नाटकाने तामिळनाडूचा 4-1 असा पराभव केला. कर्नाटकातर्फे कर्णधार राजू मनोज गायकवाड, अखिल अय्यप्पा, आकर्ष बिडाप्पा आणि अखिल मुतगार यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. तामिळनाडूतर्फे विशालने 1 गोल केला. या विभागातील दुसऱ्या सामन्यात केरळने पुडुचेरीचा 9-1 असा दणदणीत पराभव करुन पूर्ण गुण वसुल केले. केरळ संघातील साईरामने 5 गोल तर काननने 2 गोल तसेच कर्णधार मोहम्मद कैफ, राम यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुडुचेरीतर्फे एकमेव गोल दर्शनने नोंदविला. अन्य एका सामन्यात आंध्रप्रदेशने तेलंगणावर 2-1 असा विजय मिळविला. आंध्रप्रदेशतर्फे कुमारसाईने तसेच मुस्फीनखान पठाण यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article