रणजी सामन्यात तामिळनाडू सुस्थितीत
वृत्तसंस्था/ कोईमत्तूर
2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरु झालेल्या ड गटातील सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध तामिळनाडूने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. सौराष्ट्र विरुद्ध तामिळनाडूने रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशीअखेर 164 धावांची आघाडी मिळवली असून सौराष्ट्रची दुसऱ्या डावात स्थिती 5 बाद 35 अशी केविलवाणी झाली आहे. तामिळनाडू संघातील गुरजपनीत सिंगने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर 7 धावांत 4 गडी बाद केले. तत्त्पूर्वी तामिळनाडूचा पहिला डाव 367 धावांवर आटोपला.
तामिळनाडूने 3 बाद 278 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. आणि त्यांचा पहिला डाव 121.3 षटकात 367 धावांत आटोपला. साईसुदर्शनने 82 तर जगदीशनने 100 तसेच प्रदोषरंजनने 49 धावा जमविल्या. सौराष्ट्रतर्फे जयदेव उनादकटने 61 धावांत 6 गडी बाद केले. सौराष्ट्रचा संघ पहिल्या डावात 129 धावांनी पिछाडीवर राहिला. त्यानंतर तामिळनाडूच्या भेदक गोलंदाजीसमोर सौराष्ट्रची दुसऱ्या डावात स्थिती 5 बाद 35 अशी केविलवाणी झाली आहे.
संक्षिप्त धावफलक - सौराष्ट्र प. डाव 203, तामिळनाडू प. डाव 367 (साईसुदर्शन 82, जगदीशन 100, प्रदोषरंजन पॉल 49, उनादकट 6-61), सौराष्ट्र दु. डाव 25 षटकात 5 बाद 35 (वासवदा खेळत आहे 15, गुरजपनीत 4-7).