कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडूत ईडीचे चेन्नई समेत 25 ठिकाणी छापे

06:08 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

ईडीने मंगळवारी द्रमुकचे नेते जाफर सादिक आणि अन्य काही जणांच्या विरोधात अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाच्या अंतर्गत ईडीने तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत.

पीएमएलएच्या तरतुदींच्या अंतर्गत निमलष्करी दलाच्या तुकड्यांसोबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज्याची राजधानी चेन्नई, मदुराई आणि तिरुचिरापल्लीमध्ये 25 ठिकाणी झडती घेतली आहे. तमिळ चित्रपटांचा निर्माता सादिक तसेच दिग्दर्शक अमीर तसेच अन्य काही जणांच्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

सादिकला मागील महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 2 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या सुमारे 3500 किलोग्रॅम स्यूडोएफेड्रिनच्या तस्करीप्रकरणी  अटक केली होती. ईडीने सादिक आणि अन्य काही जणांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून नोंद प्रकरण आणि अन्य काही एफआयआरची दखल घेतली आहे.

सादिकचे तमिळ आणि हिंदी चित्रपट निर्मात्यांशी संबंध आहेत. तसेच काही राजकारण्यांनाही त्याने पैसा पुरविला असल्याचे एनसीबीने सांगितले आहे. सादिकची फेब्रुवारी महिन्यात द्रमुकने पक्षातून हकालपट्टी केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article