Kolhapur : करवीर तालुक्यात चिंचेचा बहर; यंदा आंबट चिंचातून शेतकऱ्यांना आर्थिक गोडवा मिळणार
यंदा चिंचा झाडांना भरघोस उत्पादन
by बाजीराव पाटील
करवीर : चिंच म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला हमखास पाणी सुटते..यंदा चिंचेच्या झाडांना सर्वत्र भरघोस प्रमाणात बहर आला असून सर्वत्र चिंचा लगडलेल्या दिसत आहेत यंदा चिंच उत्पादनात वाढ होऊन चार पैसे हातात पडत पडणार असल्याने चिंच उत्पादक व व्यवसायिक यंदा आंबट चिंचातून आर्थिक गोडवा मिळणार आहे
करवीर तालुक्यातील पश्चिम भागात चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत असून मोठ्या प्रमाण चिंचाणी लगडली आहेत त्यामुळे चिंचेपासून विविध पदार्थ बनवणाऱ्या शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे समाधान होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचा लगडण्याचे प्रमाण जास्त आहे .त्यामुळे अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक फायदा होणार असून यामुळे मजुरांना हातालाही काम मिळणार आहे
आपल्याकडे चिंचेची पारंपरिक शेती केली जात नसली तरी काही वर्षापासून अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत चिंचांची लागवड बहुतांश शेताच्या कडेने .बांधावर. डोंगर उतारच्या जमिनीवर .नदी . ओढ्याच्या काठावर तसेच निसर्गातही झालेली पाहायला मिळते शासन रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडाला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे परिसरात चिचाच्या झाडांचे प्रमाण वाढले आहे
सर्वसाधारण जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा येतो त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते पोषण वातावरण व वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्याने यंदा बऱ्याच झाडांना गतवर्षीपेक्षा अधिक चिंचा झाडांना लगडल्या असून त्याचा बहर दिसून येत आहे त्यामुळे मार्च एप्रिल महिन्यात या चिंचा काढणी वेळी उत्पादन वाढ मिळणार असून चालू वर्षीही चिंचेला चांगला भाव मिळाल्यास ऐन उन्हाळ्यात उत्पादक व व्यावसायिक चिंचेच्या दराचा उन्हाळी बोनस मिळणार आहे
सर्वसाधारण शाळा महाविद्यालय. आठवडी बाजार बस स्टॅन्ड. देवालयाचा परिसर येथे चिंचेचे गोळे तसेच चिंचा विक्रीसाठी उपलब्ध होतात. तसेच जेवणातही चिंच आमटी व भाजी मध्येही वापर करतात