कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अजय देवगणसोबत झळकणार तमन्ना

06:02 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत

Advertisement

दिग्दर्शक जगत शक्ति यांच्या आगामी चित्रपटात तमन्ना भाटिया दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण आणि संजय दत्त देखील असणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. हा एक अॅक्शन ड्रामापट असणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Advertisement

या चित्रपटाचे नाव तात्पुरत्या स्वरुपात ‘रेंजर’ ठेवण्यात आले आहे. याची निर्मिती लव फिल्म्सकडून केली जात आहे. या कंपनीने यापूर्वी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाची निर्मिती केली होती. तर नव्या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. तमन्ना लवकरच याचे चित्रिकरण अजय अन् संजय दत्तसोबत सुरू करणार आहे.

या चित्रपटातील तमन्नाला महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. तमन्नाने दिग्दर्शक जगन शक्तिसोबत पटकथेवर अनेकदा चर्चाही केली आहे. चित्रपटात आणखी काही मोठे कलाकार असणार आहेत, परंतु त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. हा चित्रपट पुढील मोठ्या स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article