For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तमन्नाला मिळाली नवी सीरिज

07:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
तमन्नाला मिळाली नवी सीरिज
Advertisement

‘आखिरी सच’च्या निर्मात्यांसोबत पुन्हा करणार काम

Advertisement

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या ‘स्त्री 2’ चित्रपटावरून चर्चेत आहे. यातील ‘आज की रात’ या गाण्यातील तिच्या नृत्याचे प्रचंड कौतुक होत आहे. याचदरम्यान तमन्ना आता नव्या सीरिजमध्ये दिसून येणार आहे. निर्माता प्रीति सिमोस यांनी एका वेबसीरिजसाठी करण जौहरचे प्रॉडक्शन हाउस धर्माटिक एंटरटेन्मेंटसोबत भागीदारी केली आहे. या सीरिजच्या मुख्य नायिकेसाठी तमन्ना भाटिया या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

तमन्नाने प्रीति सिमोस यांच्या ‘आखिरी सच’ या सीरिजमध्ये यापूर्वी काम केले होते. या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही सीरिज कुख्यात बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणावर आधारित होती. याचमुळे निर्मात्यांनी पुन्हा तमन्नाची निवड केली आहे. आता अन्य कलाकारांची निवड केली जता आहे. तमन्ना आता वेबसीरिजमध्ये काम करण्यावर भर देत आहे. याद्वारे तिला स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. तमन्ना सध्या विजय वर्मासोबतच्या स्वत:च्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. तमन्ना आणि विजय दोघेही वारंवार एकत्र दिसून येत असतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.