For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मालिक’मध्ये राजकुमार राव

07:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘मालिक’मध्ये राजकुमार राव
Advertisement

अॅक्शनपटात दिसणार दमदार अभिनेता

Advertisement

राजकुमार रावचा ‘स्त्राr 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला आहे. चालू वर्षात यापूर्वी त्याचे ‘मिस्टर अँड मिसेज माही’ आणि ‘श्रीकांत’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. स्त्राr 2 च्या तुलनेत या दोन्ही चित्रपटांमध्ये सरासरी प्रतिसाद मिळाला होता. तर आता अभिनेत्याने चालू वर्षातील स्वत:च्या चौथ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. राजकुमार हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावंत कलाकार मानला जातो. मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात त्याने फन लव्हिंग, तर ‘श्रीकांत’ या चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. या सर्व भूमिकांमधील त्याचा अभिनय उत्तमच होता. तर दुसरीकडे आता राजकुमार हा अॅक्शनपटात दिसून येणार आहे. त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘मालिक’ असणार आहे. एक दमदार डायलॉगसाब्sात राजकुमारने स्वत:चा लुक सादर केला आहे. ‘मालिक’च्या जगतात तुमचे स्वागत आहे, चित्रिकरण सुरू झाले असून लवकरच भेट होईल’ असे नमूद करत त्याने एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये राजकुमार हा जीपवर उभा असल्याचे आणि त्याच्या हातात गन असल्याचे दिसून येते.

Advertisement
Advertisement
Tags :

.