कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रेड 2’ चित्रपटात तमन्ना भाटिया

07:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘रेड 2’ या चित्रपटाचा टेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली असताना नवी माहिती समोर आली आहे. ‘रेड 2’ या चित्रपटात निर्मात्यांनी एका खास प्रमोशनल नंबरसोबत याला आणखी मसालेदार केले आहे. तमन्ना भाटियाला रॅपर यो यो हनी सिंहसोबत एका हाय-एनर्जी डान्ससाठी साइन करण्यात आले आहे. विजय गांगुलीकडून कोरियोग्राफ करण्यात आलेले हे गाणे मुंबईच्या एका स्टुडिओत चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे एक स्टँडअलोन पोस्ट-क्रेडिटच्या स्वरुपात सादर करण्यात आले आहे.

Advertisement

परंतु अजय आणि तमन्ना यांनी या ट्रॅकमध्ये स्क्रीन स्पेस शेअर केलेली नाही. अजय आणि तमन्ना यापूर्वीच ‘रेंजर’ या चित्रपटात एकत्र काम करत असून याचे दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण नोव्हेंबरपर्यंत संपुष्टात येणार आहे. राजकुमार गुप्ता यांच्याकडून दिग्दर्शित रेड 2 हा चित्रपट आयआरएस अधिकाऱ्यावर आधारित आहे. या अधिकाऱ्याकडुन यावेळी दादा भाई नावाच्या एका बाहुबली नेत्याच्या विरोधात कारवाई केली जात असल्याचे दाखविण्यात येणार आहे. चित्रपटात वाणी कपूर, रजत कपूर, सुप्रिया पाठक, अमित सियाल आणि यशपाल शर्मा हे कलाकार दिसुन येणार आहेत. तर सौरभ शुक्ला क्रूर डॉन ताऊजीच्या व्यक्तिरेखेत पुन्हा दिसून येतील.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article