For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुकास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात

10:38 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुकास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : हॉली क्रॉस इंग्लिश स्कूल बिडी खानापूर तर्फे आयोजित शालेय तालुका प्राथमिक व माध्यमिक स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन सिस्टर ज्योती फर्नांडिस मुख्याधापिका हॉली क्रॉस स्कूल बिडी यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी नियाजअहमद बागवान पी ई शिक्षक हॉली क्रॉस स्कूल, भुजंग नंदुरकर शिक्षक सिद्धिविनायक स्कूल खानापूर स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगने, ऋषीकेश पसारे, व हॉली क्रॉस स्कूल मधील इतर शिक्षक उपस्थित होते व इतर शाळेतील विद्यार्थी व प्रशिक्षक उपस्थित होते या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे 60 स्केटर्सनी सहभाग घेतला होता.

Advertisement

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे, 14 वर्षांच्या आतील मुले क्वाड-अथर्व चिकमठ 2 सुवर्ण, संस्कार पाटील 2 रौप्य, श्री गुरव 2 कांस्य, 14 वर्षा आतील मुले इनलाईन-सर्वेश मारीहाळ 3 सुवर्ण, चंद्रकांत कामोजी 3 रौप्य, विमर्ष टोंनी 3 कांस्य, प्रणित एम 1 सुवर्ण, प्रज्वल मदाकर 1 रौप्य, शिवकुमार मरभोटा 1 कांस्य, 17 वर्षा आतील मुले इनलाईन, श्रेयश पाटील 2 सुवर्ण, सोहम गावडे  2 रौप्य, यश कुरडूकर 3 सुवर्ण, याझा तांबोडी 3 रौप्य,  17 वर्षा आतील मुली क्वाड-विद्या गुरव 2 सुवर्ण. या सर्व विद्यार्थीची जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल पालक व विद्यार्थीनी आयोजकांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.