पाकिस्तान-इस्रायलदरम्यान चर्चा, गाझामध्ये सैनिक तैनात करणार
सैन्यप्रमुख मुनीर यांनीच घेतली भेट : पाकिस्तानात वादंग शक्य
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात इस्रायलच्या नामोल्लेखालाही गुन्हा मानले जाते. इस्रायलला पाकिस्तानने एक देश म्हणून मान्यता दिलेली नाही. तरीही पाकिस्तान आता स्वत:च्या धोरणांपासून मागे हटताना दिसून येत आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या बैठकीत अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानकडून गाझामध्ये 20 हजार सैनिक पाठविण्याच्या निर्णयावर सहमती व्यक्त करण्यात आली आहे. हे सैनिक इंटरनॅशनल स्टॅबिलायजेशन फोर्सचा हिस्सा असतील.
या फोर्समध्ये इजिप्त, अझरबैजान, तुर्किये यासारख्या अन्य मुस्लीम देशांचे सैनिकही सामील असतील. इजिप्तमध्ये एक गुप्त बैठक झाली असून यात आसिम मुनीर यांनी मोसादच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिकृतपणे या देशाने इस्रायलसोबत चर्चा केली आहे. या बैठकीत पाकिस्तानसमोर इस्रायलने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पाकिस्तानचे सैन्य गाझामध्ये केवळ शांतता व्यवस्था कायम करेल, तेथे अन्य कुठल्याही प्रकारच्या संघर्षात हिस्सा घेऊ शकणार नसल्याचे इस्रायलच्या सरकारने स्पष्ट केले आहे.
याचबरोबर हमासला निशस्त्र करण्याची जबाबदारीही पाकिस्तान समवेत अनेक मुस्लीम देशांच्या सुरक्षा दलांची असेल. या योजनेत पाकिस्तान, इंडोनेशिया आणि अझरबैजानसोबत मिळून काम करत असून त्यांना पाश्चिमात्य आणि अरब देशांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील केले जात आहे. या कराराच्या अटींच्या अंतर्गत पाकिस्तानी सैनिक इस्रायल आणि गाझामधील उर्वरित उग्रवादी गटांदरम्यान एक बफर फोर्सच्या स्वरुपात कार्य करतील, पुनउ&भारणी आणि संस्थात्मक पुनर्रचनेच्या सुगम करत एक सुरक्षा कवच प्रदान करणार आहेत. पाकिस्तानच्या सहकार्याला अस्थायी राजनयिक दिलाशासोबत ‘गूपचूप पुरस्कृत’ही केले जात आहे. यात नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य दबावात कमी आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या देशांतर्गत कारवाई आणि अत्याचारांवर पाश्चिमात्य मानवाधिकार संघटनांचे मौन सामील आहे.